Print
Hits: 13952

जननेंद्रियाचे कॅन्सर

 1. योनीचे कॅन्सर अंदाजे ४.८ टक्के.
 2. योनीमार्गाचे कॅन्सर २ टक्के.
 3. गर्भाशयमुखाचे कॅन्सर २५ ते ३० टक्के.
 4. गर्भाशयमुखाचे कॅन्सर ५० ते ५५ टक्के.
 5. स्त्रीबीज कोषाचे कॅन्सर १३ टक्के.
 6. आर्तव वाहिन्यांचे कॅन्सर ०.१८ ते ०.२० टक्के.

योनीचे कॅन्सर - या प्रकारचे कॅन्सर ४.८ टक्के आढळून येत असतात.

 1. लघुयोनीचे कॅन्सर २० टक्के
 2. बृहदयोनीचे कॅन्सर ४३ टक्के
 3. योनीलिंगाचे कॅन्सर २० टक्के

याप्रकारचे कॅन्सर बर्‍याचवेळा वयाच्या ६० ते ७० या कालावधीत लक्षात येतात. म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यावर. काही केसेसमध्ये गर्भाशय, गर्भाशयमुख स्त्रीबीज कोष कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमधील काळातही आढळतात. याला explation अथवा दुय्यम स्थानाचे कॅन्सर म्हणून ओळखले जाते.

 1. गुल्म हाताला लागते व दिसते. काहीवेळा व्रणीत असते.
 2. वेदना/शूल.
 3. सूज.
 4. कंड/खाज इ.

मासिक पाळी गेल्यावर जर योनीवर खाज सुटू लागली तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे असते. बर्‍याच केसेमध्ये बृहद्योनी लघुयानीच्या त्वचेचा रंग मूळ जाऊन पांढरा कोडासारखा रंग येतो. त्याला ल्यूकोप्लाकिया असे म्हणतात अशी लक्षणे असणार्‍या स्त्रियांनी वरचेवर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण बर्‍याच मोठ्या प्रमाणात अशा स्थितीमधून कॅन्सरची उत्पत्ती होताना दिसून येते. याचे निदान खालीलप्रमाणे केले जाते.
निदान
१. बायोप्सी
२. पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी
१. बायोप्सी: त्या जागेवरील बारीक तुकडा तेवढ्याच जागेवर भूल देऊन काढून तो तुकडा १० टक्के फॅर्मालीनमध्ये घालून लॅबरेटरीकडे पाठवले जाते. तेथे बरेच सेक्सन्स घेऊन त्याची तपासणी मायक्रोस्कोपखाली करून रिपोर्ट दिला जातो व त्यावरून पुढे औषधोपचार करता येतात.
२. पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी: ही तपासणी फारचे सोपी असते. यामध्ये दुषित भागातील स्त्राव काचेच्या स्लाईडवर पसरवून त्यावर समभाग अल्कोहो व स्पिरिट ओतले जाते. ती स्लाईड वाळल्यावर लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपखाली पाहून कॅन्सर पेशी दिसतात किंवा नाही याचे निदान केले जाते. चिकित्सा
एकदा का कॅन्सरचे निदान झाले तर संपूर्ण योनीवरील त्वचा रसग्रंथीसह काढली जाते.त्याला Radical Vulvaltomy असे म्हणतात. त्यानंतर अहवालानुसार कॅन्सरची स्टेज पाहून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शेक दिले जातात. त्याला Raniation Therapy असे म्हणतात. तसेच जरूरीप्रमाणे इंजेक्शनही दिली जातात. त्याला किमोथेरपी असे म्हणतात.

योनीमार्गातील कॅन्सर - योनीमार्गाचे कॅन्सर दूर्मिळपणे पाहावयास मिळतात.
लक्षणे

 1. वेदना/शूल.
 2. योनिसंबंधानंतर रक्तस्त्राव होणे.
 3. दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव व इतर स्त्राव.
 4. गुदमार्ग व मूत्रमार्गात Fistulace च्या स्वरूपात उघडले असेल तर मलमूत्रमिश्रित योनिमार्गातून स्त्राव स्त्रवतो.
 5. ओटीपोटात तीव्र वेदना १.९ टक्के ते २.० टक्के या प्रमाणात आढळतात.

वयाच्या ५५ वर्षापुढील पेशंटमध्ये अशा प्रकारचे कॅन्सर योनिमार्गाच्या वरील १/३ भागात आढळतात, तर वयाच्या २० ते ३० वर्षाच्या कालावधीत अत्यंत दुर्मिळपणे योनीमार्गाच्या खालील १/३ भागात आढळतात व असे खालील मार्गातील कॅन्सर मूत्रमार्ग व गुदमार्गात पसरून गंभीर स्वरूप धारण करतात.

बर्‍याचवेळा Vardemus Hysterectomy अंग बाहेर पडणे. या विकारावर रिंग पेसरी बसविली जाते. याची स्वच्छता न ठेवल्याने सूज येऊन ती पेसरी रूतून बसते व त्यामुळे जखमा होतात व पुढे कॅन्सर जंतूंचा प्रादुर्भाव होऊन कॅन्सर होऊ शकतो, तर काही वेळेला गर्भाशयाचे कॅन्सर खाली पसरून योनीमार्ग व्यापतात. याला दुय्यम स्थानाचे कॅन्सर म्हणतात.
चिकित्सा
संपूर्ण योनिमार्ग रसग्रंथी, रसवाहिन्यासहीत ऑपरेशन करून काढतात. जर गर्भाशयात व्याप्ती असेल तर वरदेमस हिस्ट्रेक्टॉमी नावाचे ऑपरेशन करतात आणी अहवालानुसार व तज्ञांच्या सल्ल्याने शेक देणे अथवा किमोथेरपी चालू करणे हे ठरविले जाते. जर कॅन्सरची व्याप्ती जास्त असेल तर ऑपरेशन होऊ शकत नाही.

अशा पेशंटचे आयुष्य ५ वर्षापर्यंत टिकण्याची शक्यता फक्त ५ टक्के असते. अशांना मानसिक स्वास्थ्य मिळावे म्हणून संगीत, टिव्ही, प्रोग्रॅम ऐकविले जातात. तसेच मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी अध्यात्मिक प्रबोधन केले जाते. अशी चिकित्सा सर्वच कॅन्सर पेशंटना दिली जाते.

गर्भाशयमुखाचे कॅन्सर - या प्रकारचे कॅन्सर ५० ते ६० टक्के केसेसमध्ये आढळून येतात. तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरचा विचार केला तर ८० टक्के केसेस अशा स्वरूपात असतात. या प्रकारच्या कॅन्सरचे वर्णन पाच स्टेजेसमध्ये केले जाते.

गर्भाशयमुख कॅन्सरच्या स्टेजेस (टप्पे)
स्टेज नं १ - गर्भाशय मुखाभोवती पसरलेले ऑपरेशन होऊ शकते.
स्टेज नं २ - गर्भाशयमुख व योनीमार्गात पसरलेला - ऑपरेशन होऊ शकते.
स्टेज नं ३ - गर्भाशय अ २/३ योनिमार्गाची व्याप्ती - ऑपरेशन होऊ शकत नाही
स्टेज नं ४ - गर्भाशय अ मूत्रमार्ग अमलाशय अयोनिमार्ग अयोनिवर - ऑपरेशन होऊ शकत नाही.
लक्षणे

 1. योनिसंबंधानंतर रक्तस्त्राव, सतत रक्तस्त्राव, अधूनमधून रक्तस्त्राव होणे इ.
 2. श्वेतप्रदर: योनीमार्गातून लाला पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे.
 3. पांडुरोग जास्त प्रमाणात होणे.
 4. दम लागणे.
 5. अशक्त पणा, फटफटीतपणा, निस्तेज होणे, डोळे खोल जाणे इ.
 6. तहानभुक एकदम कमी होणे.
 7. वजन खूप कमी होणे.
 8. सतत आजारी असल्यासारखे वाटणे.
 9. गर्भाशयाचा आकार मोठा होणे.
 10. कटिभागात, ओटीपोटात, योनिमार्गात, गुदमार्गात अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे. (कॅन्सरच्या ४ थ्या स्टेजमधील ही लक्षणे).
 11. लघवी संडास होताना तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे.

कारणे

 1. अल्पवयात योनिसंबंध (मैथुन) होणे.
 2. योनिसंबंधामध्ये शिश्नाची स्वच्छता नसणे.
 3. अनेक पुरूषांशी वरचेवर योनिसंबंध होने उदा. वेश्या
 4. बहुप्रसवता - जास्त प्रमाणात प्रसूति होणे
 5. गर्भाशयाच्या चट्‌टा/सरळ मऊ पडणे याला Smooth Cervical Erosion म्हणतात. म्हणून डॉक्टराने जर चट्‌टा पडला बसे सांगितले की, स्त्रिया घाबरून गर्भाशय काढून घेतात. पण अशा चट्‌ट्यांचा तुकडा तपासणी होणे जास्त योग्य ठरते.
 6. वयाच्या ४५ वर्षापुढे मासिक पाळी बंद होताना व झाल्यानंतर जननेंद्रियांच्या पेशी आकुंचन पावत असल्याने या विकारांच्या जंतूंना प्रतिकार करण्याची शक्ती कमी असते.
 7. मूल नसणार्‍या स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण फारच कमी ५ ते ८ टक्के असते.
 8. मजूर स्त्रियांमध्ये प्रोफेशनल स्त्रियांच्यापेक्षा प्रमाण जास्त असते. याची कारणे अस्वच्छ राहणीमान, अज्ञान, आळस, अंध:श्रध्दा, गरिब, अपुरी वैद्यकीय सेवा इ.

निदान

 1. योनिमार्ग तपासणी.
 2. सोनोग्राफी.
 3. पॅप स्मेअर फॉर मॅलिग्नसी.
 4. बायॉप्सी.
 5. एम.आर.आय.

चिकित्सा - सर्व कॅन्सरची सारखी असल्याने शेवटी पाहा.

गर्भाशयाचे कॅन्सर
याप्रकारचे डॉक्टर २५ टक्के ते ३० टक्के पर्यंत आढळून येतात. यांची निर्मिती बहुतांश जास्त प्रमाणात गर्भाशयाच्या आतील तिसर्‍या आवारणपेशींमधून आढळते. याला Endometrium म्हणतात.
कारणे

 1. द्राक्षरोग.
 2. गर्भापात अथवा प्रसूतीनंतर जरा तिसर्‍या आवारणांचे पेशी आत राहून त्यामध्ये तर बदल घडला तर अशा प्रकारचे कॅन्सर होतात.
 3. त्याचप्रमाणे गर्भाशयाचे कॅन्सर - हे कॅन्सर अतिशय दुर्मिळ प्रमाणत आढळतात. ४.५ टक्के या प्रमाणात आढळतात. या प्रकारचा कॅन्सर ४० ते ५० वर्ष वयाच्या आसपास होताना दिसून येतो, तर २५ टक्के कॅन्सर मूल न झालेल्या स्त्रियांमध्येही आढळून येतात.

एकंदरीत स्वरूप खालीलप्रमाणे आढळून येते.

 1. तिसरे आवरण - Endometrium पेशीमध्ये निर्मिती.
 2. गर्भाशयाच्या दुसर्‍या मांसल आवरणातून निर्मिती.
 3. काही वेळेला या आवरणातून गुल्म होत असतात व त्यातील काही गुल्ममध्ये कॅन्सरची उत्पत्ती होत असते.
 4. गर्भाशयमुखाचे कॅन्सरमधून वाढणारे तेही गर्भाशयात पसरताना दिसून येतात.

स्त्रीबीज कोषाचे कॅन्सर
या प्रकारच्या कॅन्सर विकारांचे प्रमाण अंदाजे १३ टक्के असून याची निर्मिती प्रामुख्याने मासिक पाळी बंद होण्याच्या व झालेल्या काळात आढळते. तसेच लहान वयात डर्मोईड सिस्ट नावाचे गुल्मही आढळतात. हे कॅन्सर दुय्यम स्थानाचेही आढळतात. हे मुख्यत: जठराचे कॅन्सर, आतडीचे कॅन्सर व स्तनांचे कॅन्सरच्या पसरण्यामुळे (Metastasis) मेटंस्टसेसपासूननही घडतात व त्याला क्रुकेनबर्ग ट्यूमर या नावाने ओळखले जाते.

अशा स्तनांच्या कॅन्सरमध्ये या स्त्रीबीज कोषांना जरी कॅन्सर बाधा नसली काढून टाकतात. तेही दोन पध्दतीने १. पोटावर छोटा छेद घेऊन २. दुर्बिण ऑपरेशनने काढता येते. तसेच डेर्मोईड सिस्टमध्ये जरी कॅन्सर नसले तरी वयाच्या ३० ते ३५ वर्षाच्या कालावधीत काही वेळेला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्याचे प्रमाण जास्त आढळते.

क्रुकेनबर्ग ट्यूमरच्या मूळच्या कॅन्सरमधील प्रमाण

 1. ७० टक्के
 2. आतडीचे १५ टक्के
 3. स्तनांचे कॅन्सर ६ टक्के

सर्वांत जास्त कॅन्सरचे प्रकारचे प्रकार स्त्रीबीज कोषामध्ये आढळतात. कारण स्त्रीबीज कोषाची निर्मिती मूलेरिअन नळीपासून नसून जेनेटिक रिजमधून असते.

लक्षणे

 1. मासिक पाळी बंद झाल्यावरही जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाढतो.
 2. वेदना/शूल अतिशय तीव्र स्वरूपाच्या - ओटीपोटात असतात.
 3. अनियमित भरपूर प्रमाणातील रक्तस्त्राव.
 4. जलोदर.

निदान कसे केले जाते?

 1. योनिमार्ग तपासणी.
 2. पोटावर हाताच्या स्पर्शाने.
 3. सोनोग्राफी.
 4. बायॉप्सी: दुर्बिणीद्वारे, मिनीलॅप, सोनिग्राफीच्या मदतीने.

गर्भनलिका आर्तववाहिन्यांचे कॅन्सर याचे प्रमाण फारच कमी ०.८ टक्के ते ०.२ टक्के असते. याची उत्पत्ती आर्तवाहिनीतील गर्भधारणेमुळे, कोरिओकार्सिनोमाची शक्यता असू शकते.
सर्व कॅन्सरची चिकित्सा

 1. वरदेमस हिस्ट्रेक्टॉमी - गर्भाशय संपूर्ण रसग्रंथीसहीत काढणे.
 2. रिपोर्टनुसार शेक देणे - (तज्ञांच्या सल्ल्यानुसार) किमोथेरपी - इंजेक्शन्स.
 3. अध्यात्मिक प्रबोधन - गंभीर केसेससाठी - मन:शांतीकरिता, संगीत, भक्तीगीत, टीव्ही माध्यमाचा वापर करणे.

स्तनांचे कॅन्सर
स्तनांमध्ये निर्माण होणार्‍या गाठी दोन प्रकारच्या असतात.

 1. फायब्रोऍडिनोमा - दुखणार्‍या गाठी, या साध्या असतात.
 2. न दुखणार्‍या कॅन्सरच्या गाठी की, ज्या उग्र रूप धारण करून कॅन्सरचे थैमान घडवून आणतात.
 3. अशा प्रकारचे कॅन्सर स्त्रियांमध्ये पुरूषांच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असतात.
 4. यापाठीमागे कौटुंबिक इतिहास सापडतो. आई किंवा बहिण या रोगाला बळी पडल्याचा इतिहास सापडतो. असा इतिहास असणार्‍या घरातील स्त्रियांनी वरचेवर तपासणी करून घेतली पाहिजे.
 5. कोणत्याही वयात मासिक पाळी आल्यापासून मासिक पाळी बंद झालेल्या काळातही अशा केसेस आढळतात.
 6. ५० ते ५५ वर्ष वयामध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.
 7. पाश्‍चात्य देशात याचे प्रमाण जास्त आढळते.
 8. मासिक पाळीशी निगडीत यांचे प्रमाण जास्त आढळून येते.
 9. प्रिकॉशिअस प्यूबर्टी - वयाच्या ९ ते १० वर्षाच्या आत मासिक पाळी येणार्‍या केसेसमध्ये डर्माईड सिस्ट नावाच्या गाठी स्त्रीबीज कोषात आढळतात व या गाठींमध्ये केस, दात, काही थायरॉईड ग्रंथीच्या पेशी, रक्त व काही तंतुमय पेशी, रक्त व काही तंतुमय पेशी आणि इतर घटकही आढळतात. वयाच्या २० ते ३० या काळात जरी या गाठी कॅन्सरयुक्त नसल्यातरी त्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो व हे प्रमाण १.७ टक्के असते. म्हणून सोनोग्राफीने निदान झाल्यास लगेच त्याचे दुर्बिणीद्वारे उच्चाटन करणे किंवा काढून टाकणे जरूरीचे असते.
 10. मासिक पाळी असताना म्हणजे तरूण वयातील स्तनांचे कॅन्सरचे स्वरूप गंभीर असतात, तर मासिक पाळी गेल्यानंतरचे होणारे कॅन्सर ऑपरेशन, शेक देऊन, किमोथेरपीने नीट करता येतात. याचा अर्थ स्तनांचे कॅन्सर हार्मोनशी निगडित असतात.

कॅन्सर गाठींच्या स्टेजेस/टप्पे
पहिली स्टेज: हाताला तपासणीत गाठी शक्यतो कमी लागतात किंवा काही वेळेला लागतही नाहीत.
दुसरी स्टेज: तपासणीला गाठी हाताला लागतात. पण काखेतील रसग्रंथी तपासणीत हाताला लागत नाहीत. त्याचप्रमाणे त्या गाठीचा आकार पाच मि.मि. पेक्षा कमी असतात. या गाठी वेदनाविरहित असतात. कँपमधून अथवा तपासणीमधून यांचे निदान ६६ टक्के होऊ शकते.
तिसरी स्टेज: यामधील गाठी पाच मि.मि. पेक्षा जास्त मोठ्या असतात. तपासणीत त्या त्वचेला किंवा छातीवरील बरगड्यामधील स्नायूंना चिकटलेल्या नसतात. मानेमधील रसग्रंथी म्हणजे मानेच्या हाडावरील रसग्रंथीमध्ये कॅन्सरचे जंतु पसरलेले आढळू शकतात. या स्टेजमध्ये कँपमधून अथवा तपासणीतून ४१ टक्के निदान होत असते. या गाठी मोकळ्या असल्याचे तपासणीत आढळून येतात.
चौथी स्टेज: खूप दूरवर कॅन्सर पसरलेले असतो. या गाठी छातीच्या स्नायूंना अथवा त्वचेला किंवा दोन्हीकडे चिकटलेल्या अवस्थेत तपासणीत आढळून येतात. काखेतील व मानेतील रसग्रंथीना प्रादुर्भाव झाल्याने त्या ठिकाणच्या रसग्रंथींना प्रादुर्भाव झाल्याने त्या ठिकाणच्या रसग्रंथी हाताला तपासणीत कळून येतात. त्याचप्रमाणे स्तनचुचुके आत ओढलेले, तर काही केसेसमधोन व्रणीत झालेले आढळतात. ही गंभीर गोष्ट असल्याने अशा केसेसचे निदानाचे प्रमाण १० टक्के असू शकते. एंकदरीत पाहता सर्वच कॅन्सरपेशींचे स्टेजनुसार व लक्षणानुसार आयुमर्यादेचा आलेखा पुढीलप्रमाणे आढळतो.

लक्षणे ५ वर्ष १० वर्ष
१. तुकडा तपासणी ६३ टक्के ४६ टक्के
२. रसग्रंथीमध्ये नसताना ७८ टक्के ६५ टक्के
३. काखेतील रसग्रंथीमध्ये कॅन्सरचा ४६ टक्के २५ टक्के
४. १ ते ३ रसग्रंथीमधील प्रादुर्भाव ६२ टक्के ३८ टक्के
५. चारपेक्षा जास्त रसग्रंथीमधील प्रादुर्भाव ३२ टक्के १३ टक्के

 

लक्षणे टक्केवारी
१. वेदनारहित गाठी ६६ टक्के
२. वेदनायुक्त गाठी १ टक्के
३. स्तनचुचुकावरील स्त्राव रक्तमिश्रीत स्त्राव ९ टक्के
४. जागेवर सूज ४ टक्के
५. स्तनचुचुक आत ओढणे २ टक्के
६. इतर काही लक्षणे ५ टक्के

(पांडुरोग, थकवा, वजन, कमी होणे, घट्‌ट गाठी लागणे, आजारी असल्यासारखे वाटणे)

स्व:तच स्तनाची तपासणी करावी.
याला Self Examination असे म्हणतात. लवकर निदान झाल्यास या दुर्धर रोगाने बळी पडणार्‍यांची संख्या नक्कीच कमी होऊ शकेल. आरशामध्ये बघुन तपासाणीत गाठी आहेत का ते तपासावे.

तसेच आंघोळीचे, शॉवरचे पाणी त्वचेवर पडल्यास ओल्या कातडीवरील गुल्म हातांना चांगलेच कळुन येतात. या गाठींचा स्पर्श प्रभावीपणे हाताला खुपसे काही सांगुन जातो. कॅम्पमधुन अशा गोष्टी कळल्याने एक हजार तपासणीमध्ये अंदाजे ६ हजार केसेस आढळुन येतात. अशा प्रकारची तपासणी केव्हा करावी?

 1. मासीक पाळीच्या कालावधीत.
 2. मासीक पाळी संपल्यावर मध्यवती कालवधीत.
 3. मासीक पाळ&0020;याचे स्वरुप समजुन येवु शकते. कारण फायब्रोऍडीनोमा हार्मोन्सच्या पातळीवर कार्यरत राहतात.

  मेमोग्राफी: या प्रकाराची तपासणी अंत्यत महत्वाची समजली जाते. या तपासणीमुळे ४० टक्के केसेसमध&##x0940; होण्यापुर्वी.

बर्‍याचवेळेला या गाठीचे हार्मोन्समुळे जे स्वरुप असते ते कळुन आल्याने हार्मोनल चिकित्सेला वाव मिळतो व त्याचप्रमाणे कॅन्सर फायब्रोऍडीनोमा साधा आहे का कार्सिनोजनीक आहे,ये कॅन्सरची गाठ होण्यापुर्वी निदान होऊ शकते. ही तपासणी म्हणजे कमी रेडिएशनचे एक्स-रे आणि एक्स-रे सारखे फिल्म घेतले जाणे होय. त्यामध्ये स्तननलिका (सुक्ष्मसुध्दा) मधील आवरणात घडणारा बदल दिसुन येतो. कारण स्तनाच्या कॅन्सरची निर्मिती नेहमी स्तनवाहिन्यांच्या आतील पेशींपासुन होत असते व दुसरे स्तन्य निर्माण करणार्‍या पेशीमध्ये होत असते. यांना Tubular Origin of Cancer व Lobular Origin of Cancer असे म्हटले जाते. ही मॅमोग्राफी Ordinary व Xeromemography या प्रकारे ओळखली जात असुन या Xeromemogrphy मध्ये खोटे रिपोटर्स ही False निगेटिव्ह येऊ शकते. त्यावेळी त्याची खात्री करुन घेण्यास फ़ाईन निडल ऍस्पिरेशन टेस्ट किंवा बायॅप्सी करुन खर्‍या निदानापर्यंत पोहोचता येते.

सुक्ष्म सुईच्या साहाय्याने सिंरीजमध्ये स्त्राव ओढुन घेऊन तो स्त्राव स्लाईडवर पसरवुन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने निदान केले जाते. त्याला फाईन नीडल ऍस्पिरेशन टेस्ट असे म्हणतात. यामध्ये ४० टक्के निदान होऊ शकते.

तुकडा तपासणी - जर स्तनातील गाठी हाताला लागत असतील तर एखादी गाठ काढुन १० टक्के फ़ॉर्मलीनमध्ये ठेवुन त्याचे बारीक छेद घेऊन मायक्रोस्कोपखाली तपासणी करुन अहवाल दिला जातो. यामध्ये ३५ टक्के कॅन्सरचे निदान होताना आढळुन येते.
चिकीत्सा

 1. ऑपरेशन: रसग्रंथी रसवाहिन्यांसह संपुर्ण स्तन काढुन टाकणे याला Radical Mastectomy असे म्हणतात.
 2. हार्मोनल
  अ) प्रायमरी हार्मोनल थेरपी:
  ब) दुय्यम हार्मोनल थेरपी: यामध्ये काही अंशी औषधे वापरतात की, पायुषग्रंथी, मुत्रपिंडावरील सुप्रारिनल ग्रंथी व स्त्रीबीज कोषामधुन स्त्रवणार्‍या हार्मोन्सच्या प्रभावाखाली होणारया ट्युमर्समध्ये प्रतिसाद चांगला मिळतो.
 3. शेक देणे: तंज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिले जातात.
 4. किमोथेरपी: काही कॅन्सर जंतुनाशक औषधांचा वापर तझांच्या सल्ल्यानुसार.
 5. मानसिक शांतीसाठी:
  अ. संगीत ऎकविणे, भक्तीसंगीत, प्रवचन जेणे करुन पेशंटचे मन रोगचिंतनापासुन दुर ठेवणे.
  ब. टीव्ही माध्यम
  क. आध्यमिक प्रबोधन

ही शेवटची चिकित्सा अतिगंभीर व दुर्धर रोग्यांना की ज्यांचे प्राण वाचवणे आवश्यक होते तेव्हा दिली जाते.

पुरुषातील स्तनाचे कॅन्सर
अतिशय दुर्मिळ स्वरुपात आढळतात. स्त्रियांच्या बाबतीत तुलना केली तर १०० केसेसमध्ये १ टक्के असे कॅन्सर होतात. अशा केसेस जरी पहिल्या स्टेजमध्ये असल्या तरी गंभीर स्वरुप धारण करतात. कॅन्सर निर्मितीपासुन ३ महिन्यातच पेशंट दगावतो. २५ टक्के केसेसमध्ये व्रणीत फार लवकर येत असते.