तारूण्याची चाहूल लागलेलं पंधरा-सोळा वर्षाचं खळाळत वय! अभ्यास, दंगामस्ती, कबड्डी, गॅदरिंगमधले नाच असं चहुबाजूंनी आयुष्य फुलत असतानाच मणक्याला मार लागण्याचं निमित्त झालं नसिमा दीदी अपंग नव्हे, तर पॅराप्लेजिक.
कंबरेखालच्या सर्व शरीराची पूर्ण संवेदनाच गेली. जीवन उद्ध्वस्त करून टाकणारी घटना. त्यातून बाहेर येणंच एरवी कठीण. ते नसीमा दीदींनी साधलं. आपत्तीनं त्यांना नवं बळ दिलं. स्वतःच्या दुखाःतुन बाहेर पडून इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी कोल्हापूरला अपंगांसाठी ‘हेल्पर्स’ ही संस्था सुरू केली. संस्थेचं ऑफिस, वर्कशॉप, एमआयडीसीमधील गॅस एजन्सी, अपंगांसाठी वसतिगृह बांधण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणताना केलेली धडपड ही खरोखर अवर्णनिय आहे.
गॅदरींगमध्ये डान्स करताना पडल्या आणि नसीमा दीदी यांना अपंगत्व आलं, आणि त्या इतरांसाठी काम करतात. सिनेमातल्या सुधा चंद्रन या अभिनेत्रीची आठवण झाली. कुतूहल आटलं. नसीमा दीदी व त्यांच्या सहकार्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा ‘फिल्मी’ कुतूहल धुळीला मिळालं. त्या सर्वांच्या जीवघेण्या प्रवासाचं जेव्हा दर्शन नसीमा दीदी सेंट्रल एक्साईज मध्ये नोकरी डेप्युटी ऑफिस सुपरिटेंड आहेत. टेबलाला व्हीलचेअर्स लावून समोर फाइल उघडून नेहमी प्रसन्न चेहेर्याने काम करताना दिसतात.
नसीमा दीदी यांना सतत या ना त्या वेदना होत असतात. ब्लडप्रेशरचा त्रास आहेच. त्यामुळं डोकेदुखी नेहमीची. त्यांना स्पॉडिलंयसिसचा वाढता आजार असल्यानं हाताला सतत मुंग्या येत असतात. जेव्हा मी नंतर बर्याचदा त्यांच्याशी बोलायचो, तेव्हा त्यांच्या व्हीलचेअरवरचा एक पाय सारखा उडायला लागायचा. त्या हातानं दाबून धरायच्या. नाहीतर दुसरा पाय हातानं त्यावर आडवा ठेवून त्यावर हातानं दाब देऊन तो ट्रेमर घालवायचा प्रयत्न करायच्या. पण तरीही चेहर्यावर हास्यच.
कुठून मिळाली ही त्यांना या प्रसन्न हास्याची देणगी? सर्व असून आम्ही का रडतो?
ऑफिसच्या आवारात क्वार्टर होतं. तिथं अपंग मुलं यायची. ऑफिसातही पत्ता काढत यायची. कुणाला फीला पैसे दे, कुणाला पुस्तकांना पैसे दे, कुणाला कॅलिपरला, तर कुणाला ऑपरेशनला, असा सगळा पगार त्यात संपवून टाकत. त्यात रक्तदान करण्याची त्यांना फार हौस. हॉस्पिटलकडून फोन आला रे आला की चालली त्यांची व्हीलचेअर तिकडे. दर दोन तीन महिन्याला त्या रक्त द्यायच्याच. त्यांच्या ऑफिस मधले श्री. मनोहर देशभ्रतार हे नसीमा दीदी यांच्या कामावर प्रेरीत होऊन नसीमा दीदींना ते मदत करू लागले. नसीमा दीदींनी एका हितचिंतकाला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, श्री. मनोहर देशभ्रतार हे सावली सारखे माझ्या सोबत आहेत व माझे पायही आहेत. ते असल्यावर मला चालता येत नाही हेच मी विसरून जाते. अनेक धाडसी कार्य हाती घेते. नसीमा दीदींना दुसरे गृहस्थ भेटले ते म्हणजे श्री. पी. डी. देशपांडे. हे आता संस्थेतले महत्वाचे भागीदर आहेत. त्यांनाही विचारले तुम्ही या कामात कसे आलात?
एकदा नसीमा दीदी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या तेव्हा श्री. व सौ. देशपांडे दीदींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. डोळे उघडायचीही ताकद नव्हती. तरीही पैसे कसे उभे करायचे, संस्थेपुढच्या अडचणी, अशा गोष्टींवरच बोलण चाललं होते. सुरेश भटाशीं काही दिवसांपुर्वीच माझी ओळख झाली आहे. असं मी म्हणताच लगेच त्यांचा चेहेरा उजळला. आवाज फुटला, परत ताज्या दम्यानं बेत करू लागल्या. मी अक्षरशः या दर्शनामुळे स्तिमित झालो. जवळपास डेथबेडवर या बाईला एवढा उत्साह आहे, तर आपण एवढ्या धड शरीराचे असून मागे का राहतो? त्या दिवसापासून मी या कामात पुरता ओढला गेलो.
नसीमा दीदींनी मुंबईला झालेल्या अपंगाच्या क्रिडा स्पर्धेत भाग घेतला. त्या टेबलटेनिस, भालाफेक, व्हीलचेअर रेस इ. खेळात चॅपियन आहेत. १९७३ सालातल्या इव्हिनिंग न्यूज, या मुंबईच्या पेपरमध्ये त्यांचा फोटो आला होता. त्यांना इंडिव्हिज्युअल चँपियनशिपही मिळाली होती.
या यशामुळे त्यांना इंग्लंडच्या स्पर्धेसाठीही पाठवायचे ठरले. मुंबईच्या एका संस्थेनं त्यांच्याबरोबर अटेडंट म्हणून एक फिजिओथेरपिस्ट दिली होती. याचं सर्व करू शकणारी एक घरातील किंवा सहकारी व्यक्ती पाठवायला हवी होती.
नसीमा दीदी पॅराप्लेजिक असल्यानं त्यांना लघवी-संडासचं सेन्सेशनच नसतं. अशा कामांना मदत करायला तिनं नकार दिला. इंग्लंडला गेल्यावर ती मुलगी कुठेतरी गायबच झाली. दीदींना त्या मुलीमुळे बराच त्रास सहन करावा लागला. ति मुलगी वेळेवर न आल्याने स्पोर्टमधल्या त्यांच्या इव्हेंटच्या वेळी त्या पोचूच शकल्या नाहीत. ती उगवल्यावर त्या तिथं पोचल्या. मग त्यांना जो असेल त्या इव्हेंटमध्ये भाग घ्यायला सांगितले. पण तिथं त्यांची भारतातून नेलेली व्हीलचेअरच मोडली.
तिथल्या लोकांनी त्यांना तिथली नवीन व्हीलचेअर दिली, तेव्हा त्या थोडा फार भाग घेऊ शकल्या. तुम्ही आता एकट्याच परत जा असे त्या मुलीने सांगितल्यावर नसीमा दीदींना धक्काच बसला. तीन महिन्यांचा कोर्स करून ती जेव्हा परत आली तेव्हा सारखी आमची चेअर परत द्या म्हणून पत्रे यायची. त्यावर नसीमा दीदींनी तिला कळवले की, आमची व्हीलचेअर द्या, ही व्हीलचेअर मला मिळालेली आहे, तुझी असेल तर पावती प्रोड्युस कर. मग तिनं नाद सोडला. नंतर दीदींना असे कळले की, हा त्या संस्थेचा धंदाच आहे.
अपंगाच्या नावानं कुणाला तरी फॉरेनचा चान्स द्यायच. येताना ड्युटी फ्री व्हीलचेअर आणायला सांगायची,आणि इथं भरपूर किंमतीला श्रीमंत अपंगाना विकायची. हा प्रकार दरवर्षीच घडतो पण आवाज उठवणारी दीदी पहिल्याच. व्हीलचेअर म्हणजे दीदींचा प्राणच आहे. त्या म्हणतात की, व्हीलचेअर म्हणजे शरीराचा भागच झाला आहे. अंगाला लागलं तरी चालतं ते बरं होऊ शकते. पण व्हीलचेअरचा एखादा पार्ट गेला, मोडला तर तो सहजासहजी कुठून मिळणार? हालचालचं बंद होते अगदी. दीदींची व्हीलचेअर अगदी लाईट आहे तरी त्यांना ती ढकलायला त्रास होतो त्यांच्या हातामध्ये पुर्वीसारखी ताकद राहिली नाही. तर इतर अपंगांना तर किती त्रास पडत असेल? शासनातर्फे किंवा दिखाऊ संस्थातर्फे स्वस्त व्हिलचेअर समारंभात देतात. अगदी निकृष्ट दर्ज्याच्या, स्वस्त असल्या की लगेच मोडतात. अपंग गरीब असला की तो व्हीलचेअरच मेंटेनन्स, दुरूस्त्या करू शकत नाही. मग त्या गंजून कोपर्यात पडून राहतात. अपंग जातात मग रस्त्यानं तसेच परत खरडत खरडत.
कदमवाडीत त्यांच्या संस्थेचं वर्कशॉप आहे. तिथं सर्वच अपंगच काम करतात. कोणी पाइपचे सांगडे घेऊन वेल्डिंग करीत होतं. कॅलिपर्स करण्याचं काम चाललेलं. त्याला कातडी पट्टे लागतात. ते शिवणयंत्रावर कुणी शिवत होतं. कुबड्यांचे ऍल्युमिनियमचे पाइप जोडणं चालू होतं. काखेत येणारा लाकडी भाग कोणी घासून गुळगुळीत करीत होते. अविनाश कुलकर्णी नावाचे अपंगच त्यावर देखरेख करीत होते. सायकलीचा