अपंगत्व लेख
एक असामान्य व्यक्तीमत्व - नसीमा दीदी
- Details
- Hits: 6261
तारूण्याची चाहूल लागलेलं पंधरा-सोळा वर्षाचं खळाळत वय! अभ्यास, दंगामस्ती, कबड्डी, गॅदरिंगमधले नाच असं चहुबाजूंनी आयुष्य फुलत असतानाच मणक्याला मार लागण्याचं निमित्त झालं नसिमा दीदी अपंग नव्हे, तर पॅराप्लेजिक.
कंबरेखालच्या सर्व शरीराची पूर्ण संवेदनाच गेली. जीवन उद्ध्वस्त करून टाकणारी घटना. त्यातून बाहेर येणंच एरवी कठीण. ते नसीमा दीदींनी साधलं. आपत्तीनं त्यांना नवं बळ दिलं. स्वतःच्या दुखाःतुन बाहेर पडून इतरांना मदत करण्यासाठी त्यांनी कोल्हापूरला अपंगांसाठी ‘हेल्पर्स’ ही संस्था सुरू केली. संस्थेचं ऑफिस, वर्कशॉप, एमआयडीसीमधील गॅस एजन्सी, अपंगांसाठी वसतिगृह बांधण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणताना केलेली धडपड ही खरोखर अवर्णनिय आहे.
गॅदरींगमध्ये डान्स करताना पडल्या आणि नसीमा दीदी यांना अपंगत्व आलं, आणि त्या इतरांसाठी काम करतात. सिनेमातल्या सुधा चंद्रन या अभिनेत्रीची आठवण झाली. कुतूहल आटलं. नसीमा दीदी व त्यांच्या सहकार्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा ‘फिल्मी’ कुतूहल धुळीला मिळालं. त्या सर्वांच्या जीवघेण्या प्रवासाचं जेव्हा दर्शन नसीमा दीदी सेंट्रल एक्साईज मध्ये नोकरी डेप्युटी ऑफिस सुपरिटेंड आहेत. टेबलाला व्हीलचेअर्स लावून समोर फाइल उघडून नेहमी प्रसन्न चेहेर्याने काम करताना दिसतात.
नसीमा दीदी यांना सतत या ना त्या वेदना होत असतात. ब्लडप्रेशरचा त्रास आहेच. त्यामुळं डोकेदुखी नेहमीची. त्यांना स्पॉडिलंयसिसचा वाढता आजार असल्यानं हाताला सतत मुंग्या येत असतात. जेव्हा मी नंतर बर्याचदा त्यांच्याशी बोलायचो, तेव्हा त्यांच्या व्हीलचेअरवरचा एक पाय सारखा उडायला लागायचा. त्या हातानं दाबून धरायच्या. नाहीतर दुसरा पाय हातानं त्यावर आडवा ठेवून त्यावर हातानं दाब देऊन तो ट्रेमर घालवायचा प्रयत्न करायच्या. पण तरीही चेहर्यावर हास्यच.
कुठून मिळाली ही त्यांना या प्रसन्न हास्याची देणगी? सर्व असून आम्ही का रडतो?
ऑफिसच्या आवारात क्वार्टर होतं. तिथं अपंग मुलं यायची. ऑफिसातही पत्ता काढत यायची. कुणाला फीला पैसे दे, कुणाला पुस्तकांना पैसे दे, कुणाला कॅलिपरला, तर कुणाला ऑपरेशनला, असा सगळा पगार त्यात संपवून टाकत. त्यात रक्तदान करण्याची त्यांना फार हौस. हॉस्पिटलकडून फोन आला रे आला की चालली त्यांची व्हीलचेअर तिकडे. दर दोन तीन महिन्याला त्या रक्त द्यायच्याच. त्यांच्या ऑफिस मधले श्री. मनोहर देशभ्रतार हे नसीमा दीदी यांच्या कामावर प्रेरीत होऊन नसीमा दीदींना ते मदत करू लागले. नसीमा दीदींनी एका हितचिंतकाला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, श्री. मनोहर देशभ्रतार हे सावली सारखे माझ्या सोबत आहेत व माझे पायही आहेत. ते असल्यावर मला चालता येत नाही हेच मी विसरून जाते. अनेक धाडसी कार्य हाती घेते. नसीमा दीदींना दुसरे गृहस्थ भेटले ते म्हणजे श्री. पी. डी. देशपांडे. हे आता संस्थेतले महत्वाचे भागीदर आहेत. त्यांनाही विचारले तुम्ही या कामात कसे आलात?