लोकमत
१० मार्च २०१३
आज एचआयव्ही बाधितांचा मेळावा
पॉझिटिव्ह सोल साथी आणि आरोग्य डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १0 मार्च रोजी एचआयव्ही बाधितांसाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता विजापूर रोडवर आरटीओ कार्यालयात हा मेळावा होत आहे. सोल साथी आणि आरोग्य डॉट कॉमच्या वतीने अंध, अपंगांसाठी आयोजित केलेल्या मोफत वधू-वर सूचक मेळाव्यात डॉ. श्याम जगताप, कमलाकर तिकटे, गंगाधर मदभावी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, आरोग्य डॉट कॉमचे राहुल फरांदे, शशीभूषण यलगुलवार, महेश हणमे, गोडसे आणि सहभागी झालेले नागरिक .
सोल साथी आणि आरोग्य डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत वधू-वर परिचय मेळाव्यात ७५ अस्थिव्यंग, अंध, अपंग, मूकबधिरांनी सहभाग नोंदवत लाभ घेतला.
शनिवारी सकाळी सात रस्ता येथील अबदुलपूरकर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्याचे उद््घाटन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या हस्ते झाले. औरंगाबाद, बीड, जालना, सिल्लोड आदी ठिकाणांहून अंध, अपंगांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात ६0 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली. याप्रसंगी आरोग्य डॉट कॉमचे राहुल फरांदे, आनंद शिंदे, संग्राम देवेकर, डॉ. श्यामसुंदर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा मेळावा दिवसभर चालला. आरोग्य डॉट कॉमने अंध, अपंगांसाठी प्रथमच मेळावा आयोजित केला. यापूर्वी एचआयव्ही बाधितांसाठी मेळावा घेण्यात आला होता. याप्रसंगी कमलाकर तिकटे, गंगाधर मदभावी, मयुरी वाघमारे, अमृता नळे, स्नेहा गड्डम उपस्थित होते.