Print
Hits: 3416

महाराष्ट्र टाईम्स
०८ ऑक्टोबर २०१२
पुणे, भारत.

मधुमेहासह लठ्ठपणा , किडनी , डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे सारख्या विविध आजारांनी त्रासलेल्या पेशंटला आता नव्या संशोधनातून दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत . मधुमेह झालेल्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी जठराची रचना बदलणारी ' गॅस्ट्रीक सर्जरी ' केल्यास मधुमेहासह अन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधन केले जात आहे . परिणामी उपचारासाठी होणारा खर्च वाचून पेशंटच्या शारीरिक व्याधी कमी करणे शक्य होणार आहे .

रुबी हॉल क्लिनिकमधील बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ . जयश्री तोडकर , डॉ . शशांक शहा आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ . उदय फडके याबाबत संशोधन करीत आहेत . संशोधनाबाबत डॉ . तोडकर यांनी ' मटा ' ला माहिती दिली .' लठ्ठपणाबरोबर किडनीसारख्या अन्य आजार असणाऱ्या ' टाइप टू ' प्रकारच्या मधुमेहींवर संशोधन सुरू झाले आहे . अमेरिकासह अन्य देशांत मधुमेहींची उंची व वजनाच्या आधारे काढला जाणारा तौलनिक निर्देशांक ( बीएमआय ) ३२ ते ४० असणाऱ्या पेशंटवर सर्जरी केल्यानंतर त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले . मात्र , बीएमआय २५ ते ३२ असणाऱ्यांवर सर्जरी केल्यास मधुमेहासह अन्य आजार नियंत्रण राहतात का हा संशोधनाचा खरा हेतू आहे . त्यासाठी ' टाइप टू ' प्रकारच्या ८८ मधुमेहींवर संशोधन होणार आहे . संशोधनात आतापर्यंत ४६ पेशंटचा समावेश झाला आहे . Aarogya news
निम्म्या पेशंटला सर्वाधिक चांगल्या दर्जाचे मोफत औषधोपचार तर इतरांवर ' गॅस्ट्रीक सर्जरी ' करण्यात येणार आहे ,' असे डॉ . तोडकर यांनी सांगितले .

सर्व पेशंटवर दोन वर्ष सातत्याने लक्ष ठेवले जाईल . प्रकृतीत होणारा बदल , कोणत्या औषधाने किती फरक पडतो , सर्जरीचा नेमका परिणाम हे पाहिले जाईल . वजन घटते का , अन्य आजार कमी होतात का , शरिररातील ' हार्मोन्स ' बदलतात का याचेही निरीक्षण केले जाणार आहे . यासाठी मधुमेह झालेल्यांना संशोधनात सहभागी होण्याची इच्छा असल्यासे रुबी हॉस्पिटलमध्ये ०२० - ६६४५५३०६ यावर संपर्क साधावा , असे आवाहन डॉ . तोडकर यांनी केले .

सर्जरीनंतर पडला फरक

' सहा वर्षापासून मला मधुमेह आहे . यकृत व किडनीला सूज आली होती . डोळ्यांना दिसेनासे झाले होते . संशोधनात सहभागी झाले आणि तीन सप्टेंबरला माझ्यावर ' गॅस्ट्रीक सर्जरी ' झाली . त्यामुळे महिन्यात आठ किलो वजन घटले व सूजही नाहीशी झाली . साखरेचे कमी जास्त प्रमाण नियंत्रणात आल्याने मला आता बरे वाटते आहे ,' अशा शब्दांत बदलापूरच्या पेशंट गीता टेंबूलकर यांनी प्रतिक्रिया दिली .

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ’Fair dealing’ or ’Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.