सकाळ .
१० जुलै २०१२
पुणे – होमिओपॅथी डॉक्टरांना ऍलोपॅथी औषधे वापरण्याची परवानगी मिळावी आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंद व्हावी, या मागणीसाठी महाराष्ट्र होमिओपॅथिक जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने दहा ते 12 जुलै रोजी राज्यव्यापी संप घोषित केला आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेश वायळ, डॉ. राजेश रांजणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंबंधी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. राजेंद्र गावित यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. रांजणीकर म्हणाले, 'एमबीबीएस डॉक्टरप्रमाणेच आमचे शिक्षण झाले आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स आणि होमिओपॅथिक डॉक्टर प्रामुख्याने आरोग्यव्यवस्थेचा कणा आहेत. ग्रामीण भागात आम्ही वैद्यकीय सेवा देतो. अंगणवाडी सेविकांनाही ऍलोपॅथी औषधे वापरण्याची परवानगी आहे; पण ऍलोपॅथी औषधे वापरण्याची परवानगी आम्हाला मिळत नाही."