महाराष्ट्र टाइम्स
२७ एप्रिल २०१२
पुणे भारत
नेत्र संकलनात मुंबई आघाडीवर, पुणे दुसऱ्या क्रमांकावर
२७४५ जणांना राज्यात 'दृष्टी' राज्यातील नेत्रपेढ्यांतून सहा हजार ९१४ एवढे डोळे संकलित करण्यात आल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक डोळे या वर्षी संकलित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संकलित डोळ्यांपैकी राज्यातील सुमारे दोन हजार ७४५ अंधांना 'दृष्टी' प्राप्त करून देण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांतून ५२ खासगी आणि सरकारी नेत्रपेढ्या कार्यरत आहेत. त्या नेत्रपेढ्यांमधून दरवषीर् नेत्र संकलन केले जाते. संकलित केलेल्या डोळ्यांचा अंधांना 'दृष्टी' देण्यासाठी वापर केला जातो. या वषीर् सहा हजार सातशे एवढे 'टागेर्ट' ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे सुमारे दोन हजार ७४५ लोकांना नेत्ररोपणाद्वारे दृष्टी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य अंधत्व नियंत्रण समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'मटा'ला दिली.
नेत्र संकलनासाठी राज्यातील विविध नेत्रपेढ्यांना ७५० रुपये अनुदान दिले जाते. त्या अनुदानात डोळे संकलन आणि त्याचे जतन यांच्यासाठी समावेश आहे. एकूण संकलित डोळ्यांपैकी दोन हजार ७४५ व्यक्तींना नेत्ररोपण करण्यात आले, म्हणजेच अवघे चाळीस टक्के अंधांना 'दृष्टी' देण्यात यश आले आहे. आतापर्यंत एकूण संकलित केलेल्या डोळ्यांपैकी केवळ ३० ते ३२ टक्के जणांना 'डोळे' प्राप्त होतात. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दृष्टी प्राप्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. एकूणच डोळे संकलित होण्याची संख्या अधिक असली, तरी नेत्रदान करणाऱ्यांपैकी अनेकजण वृद्ध, विविध आजाराने बाधित असल्याने त्यांच्या डोळ्यांची दृष्टी चांगली असतेच असे नाही. त्यामुळे ते डोळे नेत्ररोपणासाठी उपयुक्त ठरत नाहीत. या वषीर् संकलित झालेल्या डोळ्यांपैकी चार हजार १६९ डोळे हे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यास, संशोधनासाठी देण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.