लोकमत
०२ मार्च २०१२
पुणे भारत
ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा झटका येऊन बंद पडलेली रक्तवाहिनी अँन्जिओप्लाटीच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात आली. त्याच वेळी हृदयाला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनीही बंद पडल्याने ती सुरू करण्यासाठी गुंतागुंतीची अँन्जिओप्लास्टी यशस्वीपणे पार पाडण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश मिळाले.
हृदय शल्यचिकित्स डॉ. शिरीष हिरेमठ यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण इंडिया लाईव्ह २0१२ या आंतरराष्ट्रीय परिषदेत करण्यात आले. तसेच ४५ वर्षीय
एका व्यक्तीवरही डॉ. हिरेमठ यांनी कठीण अशी इंटरव्हेन्शनल अँन्जीओप्लास्टी केली.
या व्यक्तीलाही हृदयविकाराचा झटका आला होता आणि हृदयाला रक्तपुरवठा करणार्या मुख्य रक्तवाहिनीत डाव्या बाजूला अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरूणपणात हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याबाबत डॉ. हिरेमठ म्हणाले, भारतीय तरूणांमध्ये मोठया प्रमाणात हृदयविकार दिसून येवू लागले आहेत.
नव्या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया सोपी नव्या व सुरक्षित तंत्रज्ञानामुळे हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे बायपास, ओपन हार्ट सर्जरी हे धोकेही कमी करण्यात
यश मिळत असून शस्त्रक्रियेचा तेवढाच भाग बधीर करून शस्त्रक्रिया करता येते.