महाराष्ट्र टाईम्स
०५ सप्टेमबर २०१२
पुणे, भारत.
शहराच्या मध्यवर्ती भागात घोले रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डॉ . मनोहर जोशी मेमोरियल ( एमजेएम ) हॉस्पिटलमध्ये आता पचनसंस्थांच्या विकारांवर अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्यात येणार असून , छोट्या आतड्यांचेही सूक्ष्म परीक्षण करणे शक्य होणार आहे .
ज्येष्ठ चिकित्सक डॉ . मनोहर जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे . पहिल्या टप्प्यात पन्नास तर , दुसऱ्या टप्प्यात शंभर खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे . अकरा हजार चौरस फूट क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये ' गॅस्ट्रोन्टरॉलॉजी ' म्हणजे पचनसंस्थेच्या आजारांवर विशेष भर देण्यात आला आहे , अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ . मुकुंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली . पचनसंस्थेच्या आजारावर उपचारासाठी जपानी तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत उपकरणे हे या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे . या शिवाय पुण्यात प्रथमच छोट्या आतड्यांच्या परीक्षणासाठी ' एन्टरोस्कोपी ' सुरू केली आहे .
पचनसंस्थेच्या आजाराच्या ऑपरेशनसाठी अत्याधुनिक ' लॅप्रोस्कोपी ' ची प्रगत तंत्रज्ञान प्रणाली बसविण्यात आली आहे , असेही डॉ . जोशी यांनी सांगितले . चार मजल्यांच्या या हॉस्पिटलमध्ये अपघात विभाग , मल्टी स्लाइस सीटी स्कॅन , विकृती विज्ञान , औषधनिर्माण असे विभाग आहेत . हृदयरोग , बालरोग चिकित्साक , स्त्री रोग , कर्करोग , मूत्ररोग , बॅरिएट्रीक , कॉस्मेटिक ऑपरेशन , वेदना व्यवस्थापन , कान , नाक , घसा , यासारखे अनेक विभागदेखील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत .