सकाळ
28 जून 2012
अहमदाबाद– गुजरातमधील जुनागड जिल्हा रुग्णालयात 23 बालकांना "एचआयव्ही'ची बाधा झाल्याचे प्रकरण "सीबीआय'कडे सोपविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने आज दिले. या प्रकरणाचा तपास गांभीर्याने न केल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणीही केली आहे.
रक्त चढविण्याच्या प्रक्रियेदरम्यान या बालकांना "एचआयव्ही'ची बाधा झाल्याचा आरोप आहे. काही मुलांच्या पालकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. रक्ताच्या पिशव्या सर्वोदय रक्तपेढीतून आणण्यात आल्या होत्या. ही रक्तपेढी भाजपचे स्थानिक आमदार महेरना मश्रू यांच्यामार्फत चालविली जाते. पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर व प्रशासनावर निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल गुन्हा नोंदवला. मात्र, सर्वोदय रक्तपेढी आणि तिच्या संचालकांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, याबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.