Print
Hits: 2405

सकाळ वृत्तसेवा
०९ मर्च २०११
पुणे, भारत

""महिलांमधील कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक असून, देशात दर वर्षी सुमारे सव्वा लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. हे प्रकार टाळण्यासाठी महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती करण्याची गरज आहे,'' असे मत स्तन कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनुपमा माने यांनी व्यक्त केले.

रुबी हॉल क्‍लिनिकमधील कमलनयन बजाज कॅन्सर सेंटरतर्फे महिला दिनानिमित्त मंगळवारी महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी ही माहिती दिली. "थरमॅक्‍स'च्या अध्यक्षा मेहर पदमजी, कोरिना मॅन्युअल, करीन आनंद आदी या वेळी उपस्थित होत्या.

सेंटरचे अध्यक्ष डॉ. अशोक भणगे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाल्या की, या रुग्णालयातील बहुतांश उच्चपदस्थ महिला कर्मचारी आहेत. भविष्यात गर्भाशयाच्या कर्करोगाबरोबरच स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असल्याकडे महिलांचे लक्ष वेधण्यात आले. त्यासाठी नियमितपणे तपासणी करण्याचा सल्लाही देण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या महिलांची कर्करोगासंबंधी मोफत तपासणी करण्यात आली.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.