महाराष्ट्र टाइम्स
१९ नोव्हेंबर २०११
नवी दिल्ली भारत
मागास भागांतील तसेच देशातील कोणत्याही बोर्डातील विद्यार्थ्याचे डॉक्टर बनण्याचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीत किमान ५० टक्के गुण मिळवण्याचा नियम पर्सेन्टाइल फॉर्म्युल्यामुळे मोडीत निघणार आहे. या नव्या फॉर्म्युल्यामुळे ५० टक्क्यांहून कमी गुण मिळवणा-या विद्यार्थ्यासाठीही प्रवेश परीक्षेचे दार उघडले जाणार आहे.
देशातील ३३५ मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पुढल्या शैक्षणिक वर्षापासून पीएमटी अथवा अन्य प्रवेश परीक्षांऐवजी नॅशनल एलिजिबिलिटी अँड एंट्रन्स टेस्ट (एनईईटी) द्यावी लागणार आहे. 'एनईईटी'ची पहिली प्रवेश परीक्षा १३ मे २०१२ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक राज्यात उच्च माध्यमिक बोर्डातफेर् घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेच्या गुणवत्तेत सध्या बरीच तफावत आहे. त्यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी नव्या पद्धतीनुसार मेडिकल प्रवेश परीक्षांचे नियंत्रण सीबीएसईकडे असेल. सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अन्य बोर्डांच्या तुलनेत अधिक गुण मिळतात. त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी या प्रवेश परीक्षेला तीव्र विरोध दर्शवला होता. गुणवत्ता असूनही बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे आमचे विद्याथीर् प्रवेशापासून वंचित राहतील, अशी भीतीही विविध राज्य सरकारांनी लेखी स्वरुपात मांडली होती. पण पसेर्ंटाइल फॉर्म्युल्याचा अवलंब करून आता हा तिढा सोडवण्याचा निर्णय झाला आहे.
प्रादेशिक भाषांसाठी प्रयत्न
एनईईटीची प्रवेश परीक्षा इंग्रजी व हिंदी भाषेत होईल. वेळ थोडाच शिल्लक असल्याने प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याबाबत एनईईटी व सीबीएसईने आरोग्य मंत्रालयाला असमर्थता कळवली आहे. तथापि अनेक राज्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी केली असल्याने आरोग्य मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाशी विचारविनिमय सुरू केला आहे.
मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी पर्सेन्टाइलचा निकष
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्याना अन्य बोर्डाच्या तुलनेत जादा गुण मिळत असल्याने केंद सरकारने मेडिकलच्या प्रवेश परीक्षेच्या पात्रतेचा निकष ठरवण्यासाठी पर्सेन्टाइल पद्धतीचा अवलंब केला आहे.
देशात २८ उच्च माध्यमिक बोर्ड आहेत. या सर्व बोर्डात पहिला क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्याच्या टक्केवारीची सरासरी काढली जाईल. ही सरासरी म्हणजे १०० टक्के असे गृहीत धरले जाईल. उदाहणार्थ सीबीएसई बोर्डात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला ९८.६ टक्के गुण मिळाले असतील, उत्तर प्रदेश बोर्डातील विद्यार्थ्याला ९४ टक्के, महाराष्ट्र बोर्डात ९८ टक्के, झारखंड बोर्डातील पहिल्या विद्यार्थ्याला ८१ टक्के असतील तर या चौघांच्या टक्केवारीची सरासरी होईल, ९२.९ टक्के. पर्सेटाइल फॉर्म्युल्यानुसार ९२.९ टक्के = १०० टक्के. त्यामुळे ९२.९च्या ५० टक्के म्हणजे ४६.४५ टक्के इतके गुण मिळवणारा देशातील कोणताही विद्यार्थी एनईईटीच्या प्रवेशपरीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. दरवर्षी पर्सेन्टाइलची सरासरी त्यावषीर्च्या प्रथम क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्याच्या टक्केवारीनुसार बदलती असेल. मात्र तरीही ही सरासरी ५० टक्क्यांहून अधिक जाणार नाही.