सकाळ वृत्तसेवा
१० जुन २०११
कोलकत्ता, भारत
देशामध्ये सुमारे ७० हजार लहान मुले एचआयव्ही बाधित असल्याचे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने आज (शुक्रवार) सांगितले. यांमधील बहुसंख्य मुलांना पालकांकडूनच बाधा झाली असल्याचे संस्थेने सांगितले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाची युनिसेफ ही संस्था आणि राज्याच्या एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण समाज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एका सेमिनारमध्ये ही माहिती देण्यात आली.
""मातांकडून लहान मुलांना एड्सची बाधा होण्याचे प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. याबाबतीत राज्यसरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना युनिसेफचा पाठिंबा आहे,'' असे भारतामधील युनिसेफचे प्रमुख इवोन कॅमारोनी यांनी सांगितले आहे.
भारतामध्ये ७० हजार मुले "एचआयव्ही'ग्रस्त
- Details
- Hits: 3385
0