महाराष्ट्र टाइम्स
१० डिसेंबर २०११
चैत्राली चांदोरकर पुणे आमचा रमेश पूर्वी खूप अभ्यास करत होता, आता अभ्यासात लक्षच नसते. मित्रांमध्येही तो रमत नाही, खूप हुशार आहे, पण अलिकडे त्याचं काहीतरी बिनसलयं... हा आणि असे अनेक प्रश्न पालकांना पडतात. मुलांच्या मनात नेमकं काय चाललय हे त्यांना जाणून घ्यायचं असतं पण कसं ते कळत नाही...... पालकांनो 'टेन्शन नको' तुम्ही तुमच्या मुलाचा मानसपट (सायकोग्राफ)समजून घ्या आणि समस्यांवर मार्ग काढा!
नोकरदार पालकांमुळे पाल्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळेच, आपला बंड्या-चिंटीचे पुढे होणार काय, अशा विवंचनेत ते असतात. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकेतफेर् मुलाचा मानसपट काढून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बुद्ध्यांक चाचणीपेक्षा ही चाचणी पूर्ण वेगळी असून, यात पालकांना त्यांच्या पाल्याची बुद्धिमत्ता, आवड, बलस्थाने, कमतरता, समायोजन आणि काही व्यक्तिगुणांची माहिती या मानसपटात आपल्याला कळते. यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचणीतून समस्येचे मूळ समोर येत असून, काउन्सिलिंगमधून आम्ही पालकांना त्यावर मार्गही दाखवतो, अशी माहिती संशोधिकेच्या समन्वयक मानसतज्ज्ञ अनिता देशपांडे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, 'प्रज्ञा मानस संशोधिकेतफेर् मुलांचा मानसपट या विषयावर संशोधन सुरू असून, याच प्रकल्पांतर्गत प्रत्येक महिन्यात दोन दिवस खास मानसपट काढून देण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यामध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येत असून, कोणत्याही पूर्वतयारीची आवश्यक ता नसते. चाचण्यांची सत्रे रोज तीन तास आहेत. पालकांकडून पाल्याविषयी काही आवश्यक माहिती घेतली जाते.'
चाचण्यांचे निष्कर्ष हे विश्वसनीय आणि यथार्थ तर असतातच शिवाय ते विद्यार्थ्यांच्या गरजेचेही निदेर्शक असतात. चाचण्यांचे निष्कर्ष हे पालकांना स्वतंत्रपणे समजावून सांगितले जातात. विद्यार्थ्यांची बलस्थाने आणि कमकुवत क्षेत्रे ओळखण्यासाठी या चाचण्यांच्या निष्कर्षांची मदत होते. मुलांचा अभ्यास, करिअर याच्याही पलिकडे जाऊन त्यांच्या मानसिक स्थितीचे चित्र यातून स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले.
या महिन्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी संशोधिकेतफेर् कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे. यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ज्योत्स्ना जोशी यांच्यांशी २४२०७१४५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.