सकाळ वृत्तसेवा
१७ फ़ेबुवारी २०११
पुणे, भारत
देशातील सर्वांत कमी वजन असलेल्या मुलीचा पुण्यात जन्म झाला असून, कमी वजन असूनही मुलीला जिवंत ठेवण्यात यश आले आहे, अशा प्रकारची घटना भारतात पहिल्यांदाच घडल्याची माहिती डॉक्टरांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.
येथील खासगी रुग्णालयात दोन ऑक्टोबर रोजी एका मुलीचा जन्म झाला होता. जन्माच्या वेळी या मुलीचे वजन अवघे ४९५ ग्रॅम होते. एवढे कमी वजन असूनही, या मुलीला जिवंत ठेवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. मुलगी आता चार महिन्यांची झाली असून, तिचे वजन आता २.४ किलो झाले आहे.
पारनेर (जि. नगर) तालुक्यातील कासारी गावातील दांपत्याने या मुलीला जन्म दिला आहे. मुलीचे वडील शिक्षक असून, या दांपत्यांना अनेक वर्षे मूल होत नव्हते. नारायणगावमधील डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतर या दांपत्याला हे अपत्य झाले आहे.
देशातील कमी वजनाच्या मुलीचा पुण्यात जन्म
- Details
- Hits: 2715
0