Print
Hits: 2661

सकाळ वृत्तसेवा
१८ फ़ेबुवारी २०११
वाशी, भारत

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेणे आवश्‍यक आहे, असे आवाहन आयुष ममता ग्रुप ऑफ पॅरामेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ. हेमलता जाधव यांनी आज घणसोली येथे एका शिबिरात केले.

आयुष ममता ग्रुप ऑफ पॅरामेडिकल कॉलेज ऍण्ड हॉस्पिटल, ऐरोली व वर्ल्ड डायबेटिक फाऊंडेशन; तसेच इंडिया डायबेटिक फाऊंडेशनच्या वतीने आज "डायबेटिस' या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. त्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. हेमलता जाधव बोलत होत्या. हे शिबिर 19 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत घणसोली गावात आयुष ममता क्रिटिकेअर रुग्णालयात सुरू राहणार आहे. डायबेटिस कसा आणि कशामुळे होतो, त्यावर कोणते उपचार आहेत, याविषयी प्रशिक्षणार्थी परिचारिकांना मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. डॉ. जाधव यांच्या पॅरामेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेऊन मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात खासगी व सरकारी रुग्णालयांत काम करणाऱ्या सुमारे शंभर परिचारिका व वैद्यकीय अधिकारी शिबिरात सहभागी झाले आहेत.

या शिबिरात आयुष ममता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. वसंत जाधव, संचालिका डॉ. हेमलता जाधव, प्रकल्प संचालक डॉ. शिवकुमार हिरामथ, डॉ. अरुलकुमार, शिवा प्रसाद आदी तज्ज्ञ उपस्थित आहेत. शिबिराविषयी अधिक माहितीसाठी डॉ. जाधव यांच्याशी 9321221000, 9321221000 या भ्रमणध्वनींवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.