सकाळ वृत्तसेवा
२६ मे २०११
नवी दिल्ली, भारत
बालक मृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे आता सर्व सरकारी रुग्णालयांतून गर्भवती महिलांना औषधे व आहार पुढील महिन्यापासून मोफत देण्यात येणार आहेत.
"ही नवी योजना एक जूनपासून लागू करण्यात येणार आहेत. औषधोपचाराव्यतिरिक्त आरोग्य केंद्रांपर्यंत येण्याचा आणि त्यांना परत घरी सोडण्याचा खर्चही सरकारतर्फे करण्यात येणार आहे. सर्व गर्भवती महिलांना मोफत औषधोपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारांना करण्यात आल्या आहेत,'' असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
गर्भवती महिलांना मोफत औषधे
- Details
- Hits: 3655
0