सकाळ वृत्तसेवा
०३ सप्टेबर २०११
मुंबई, भारत
राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने "ऍबट न्युट्रिशन'ने "निरोगी माता, निरोगी बाळ' हा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे. यात भारतातील वेगवेगळ्या शहरांमधील आरोग्यनिगा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांबरोबर सहकार्य करून गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या मातांसाठी "चांगले पोषण' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
मातृत्वाचे दिवस बाळाच्या भविष्यातील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा काळ असतो. संशोधनानेही हे सिद्ध झाले आहे, की प्रौढावस्थेत उद्भवणाऱ्या अनेक आजारांचे मूळ भ्रूणावस्थेत असू शकते. त्यामुळेच मातांना आणि मातृत्वाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या आहारातील पोषण घटकांच्या महत्त्वाविषयी जागरूक करणे हाच या समुपदेशनामागचा मुख्य उद्देश आहे.
ऍबट निरोगी माता, निरोगी बाळ उपक्रम 100 शहरांतील आरोग्यनिगा व्यावसायिकांबरोबरच्या आणि "ममाज बेस्ट' या आईसाठी पोषण पुरवठा उत्पादनाच्या सहकार्याने राबविला जात आहे. यामध्ये नर्सिंग होम्स आणि क्लिनिक्समधून तज्ज्ञांच्या माध्यमातून वैयक्तिक पोषण समुपदेशनसुद्धा केले जाईल. ज्यात गरोदरपणाच्या काळातील पोषण, व्यायाम, आहार आदी बाबींवर भर दिला जाईल.
या उपक्रमाअंतर्गत टोल फ्री क्रमांकाद्वारेही मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतात कोठूनही 1800-22-0046 या टोल फ्री क्रमांकावर गर्भवती संपर्क साधून व्यावसायिक आहार तज्ज्ञांकडून पोषणविषयक सल्ला घेऊ शकतात. भारतातील लहान-मोठ्या खेड्यांमध्ये पोषण आहाराची योग्य माहिती मिळविणे खूप कठीण होऊन जाते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भारतातील 100 शहरांत हा उपक्रम घेऊन जाण्याचा आमचा उद्देश असल्याचे "ऍबट न्युट्रिशन'चे व्यवस्थापकीय संचालक रेहान खान यांनी सांगितले.
या उपक्रमाअंतर्गत मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर व रायगड येथील निवडक क्लिनिक्स रुग्णालयांमध्ये समुपदेशन केले जाईल.
गर्भवतींसाठी 100 शहरांत समुपदेशन (2)
- Details
- Hits: 3222
0