Print
Hits: 2945

सकाळ वृत्तसेवा
१८ जुलै २०११
नवी दिल्ली, भारत

आयुष्याचा उत्तरार्ध अधिक सुखाचा आणि समाधानाचा जावा, यासाठी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील मंडळी धडपडत असतात. मुंबईतील एका 78 वर्षीय वयोवृद्ध गृहस्थास त्यांच्या मुलीने आपल्या यकृताचा काही भाग देऊन वडिलांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखकर केली आहे. विशेष म्हणजे, यकृत प्रत्यारोपण करणारे ते भारतातील सर्वांत वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.

78 वर्षीय एन. एन. मेहरा असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर नुकतीच दिल्ली येथे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर ट्रान्सप्लांट अँड रेगेनेरेटिव्ह मेडिसीन, मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. ए. सोईन म्हणाले की, सध्याचे जग खूपच वेगवान झाले असून, यकृत प्रत्यारोपणाला आता वयाचे कोणतेही बंधन राहिलेले नाही. मेंदाता येथे गेल्या वर्षभरात तीन महिन्यांच्या बाळापासून ते 78 वर्षांच्या आजोबापर्यंत अशा 240 यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. मेहरा हे यकृत प्रत्यारोपण स्वीकारणारे सर्वांत वयस्कर व्यक्ती ठरल्या आणि त्यांनी सिद्ध करून दाखविले की, वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असाल तर यकृत प्रत्यारोपणाला कोणतीही अडचण येणार नाही. आतापर्यंत 70 ज्येष्ठ नागरिकांच्या यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली असून, आपण त्यांना आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देतो. दिल्लीचे रहिवासी जे. आर. वर्मा यांच्यावर 1999 रोजी वयाच्या 79 वर्षी गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. मात्र, चार महिन्यांपूर्वी वर्मा घरातच पडल्यामुळे त्यांच्या गुडघ्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केली. त्यांचे वय सध्या 91 आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.