सकाळ वृत्तसेवा
०१ मार्च २०११
चिपळूण, कोकण रत्नागीरी, भारत
चिपळूण, ता. 28 : चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अपंग कल्याण विभागातर्फे अपंगांचा मेळावा उत्साहात झाला. 250 हून अधिक अपंग मेळाव्यात सहभागी झाले होते.
मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार रमेश कदम, रोटरीचे अध्यक्ष अल्ताफ सरगुरुह, केमिस्ट असोसिएटसचे प्रवीण मोने यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा रुग्णालयातून आलेले डॉ. कशेळकर, डॉ. वाघमारे, डॉ. पाखरे यांनी अपंगांना तपासून सुमारे 50 अस्थिव्यंगाना प्रमाणपत्र दिली. तसेच 70 अपंगांना समाज कल्याण विभागाची अपंग ओळखपत्रे देण्यात आली. त्याचप्रमाणे एसटी पास, रेल्वे पास, पेन्शन याबाबतची कार्यवाही यावेळी करण्यात आली. तसेच रोटरी क्लब चिपळूणतर्फे दोन सायकली व केमिस्ट असोसिएटसतर्फे दोन सायकली व कृत्रिम अवयव देण्याचे जाहीर केले.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयद्रंथ खताते, वैद्यकीय अधीक्षक कांचन मदार, नगरसेवक उज्वला जाधव, हुस्नबानू पाते, हर्षदा भोसले, उपनगराध्यक्ष रतन पवार, मदन वेस्वीकर उपस्थित होते.
अपंग मेळाव्यात प्रमाणपत्रांचे वितरण अडीचशेहून अधिक जण सहभागी
- Details
- Hits: 2666
0