सकाळ वृत्तसेवा
११ नोव्हेंबर २०१०
नवी दिल्ली, भारत
भाभा आण्विक संशोधन केंद्रात गेल्या 14 वर्षांत 69 कर्मचारी कर्करोगाने मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी आज राज्यसभेत दिली. राजीव चंद्रशेखर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. कर्मचारी वयवर्षे 60 खालील होते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
भाभा केंद्रात 16 हजारहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यातील 12 हजार कर्मचारी तांत्रिक स्वरूपाचे काम करतात. जानेवारी 1995 ते 2009 या काळात केंद्रातील 69 कर्मचाऱ्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. हे सर्व कर्मचारी 60 वयाखालील होते. हे प्रमाण वर्षाला 30.49 टक्के आहे. मुंबईतील केंद्रात हे प्रमाण एक लाखामागे 36 इतके आहे. हे मृत्यू किरणोत्सर्गामुळे होत असले, तरीदेखील त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
14 वर्षांत भाभातील 69 कर्मचाऱ्यांचा कर्करोगाने मृत्यू
- Details
- Hits: 3389
0