सकाळ वृत्तसेवा
१९ मे २०१०
कोल्हापूर, भारत
हृदयाची झडप बदलण्यासाठी विनाछेद शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात विकसित झाले असून यासाठी आवश्यक अमेरिकन साधनसामग्री उपलब्ध करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरात हृदयविकारावर सध्याच्या उपचार पद्धतीमुळेच अमेरिकेतील एका महिलेवर येथे पहिल्यांना अँजिओप्लास्टी केली, अशी माहिती सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. अर्जुन आडनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, कोल्हापुरात हृदयविकार उपचार पद्धतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. हृदयास पडलेले छिद्र शरीराचा छेद घेऊनच बंद करावे लागत असल्याची पारंपरिक पद्धती आहे. त्यामुळे मुलींत अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात अशा सहा मुलींवर विनाछेद शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रियेसाठी केवळ 20 मिनिटांचा अवधी लागतो. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी असा रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.
ते म्हणाले, कोल्हापुरात उपलब्ध असलेल्या या उपचार पद्धतीमुळेच अमेरिकेतील महिला कोल्हापुरात उपचारासाठी दाखल झाली होती. हृदय व मेंदू यांच्यामध्ये असलेल्या रक्तवाहिनीमधील अडचण असलेल्या विकारांनी महिला त्रस्त होती. तिच्यावर अँजिओप्लास्टी करून हा विकार बंद केला. यशस्वी उपचार पद्धतीमुळे कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर झळकले. जगातील दुसरी, तर भारतातील अशी पहिलीच शस्त्रक्रिया होती. भविष्यात अशा शस्त्रक्रिया करावे लागणारे रुग्ण कोल्हापुरात दाखल होतील.
सीपीआरचे हृदय शल्यविशारद डॉ. किशोर देवरे, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. शर्मिला गायकवाड, डॉ. रणजित सावंत यावेळी उपस्थित होते.
हृदयाची झडप बदलण्यास विनाछेद शस्त्रक्रिया तंत्र विकसित
- Details
- Hits: 3123
0