Print
Hits: 2973

सकाळ वृत्तसेवा
२२ जुन २०१०
ठाणे, भारत

मुलुंडच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये एका 60 वर्षांच्या पुरुषाच्या मानेच्या गंभीर स्पॉंडिलिसीस विकारावर "सर्व्हायकल स्पॉंडिलिसीस मायेलोपॅथी'द्वारे उपचार करण्यात आले. या शस्त्रक्रियेमुळे हा विकार कायमचा दूर झाला, अशी माहिती फोर्टीस हॉस्पिटलचे डॉ. दीपू बॅनर्जी यांनी दिली.

'सत्कार रेसिडेन्सी'मध्ये पत्रकार परिषदेत डॉ. बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. 60 वर्षांचे विलास पांचाळ दोन वर्षांपासून मानदुखीमुळे हैराण झाले होते. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. डिसेंबर 2009 पासून त्यांच्या वेदना वाढून त्यांना चालणेही अशक्‍य झाले. मज्जारज्जूंतील तीन मणक्‍यांमधील जागा आक्रसली गेल्याने डॉ. बॅनर्जी यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. या शस्त्रक्रियेत टाययॅनियमच्या धातूने मणके स्थिर ठेवण्यात आले आहेत. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने दोन माणसांच्या आधाराशिवाय यापूर्वी चालता न येणाऱ्या विलास पाटील यांना आता कामावर जाणेही शक्‍य झाल्याचे डॉ. बॅनर्जी यांनी सांगितले.

देशात अनेक वेळा मानदुखीकडे केवळ तात्पुरते दुखणे म्हणून दुर्लक्ष केले जाते, पण हा आजार मज्जारज्जूंचा असल्याने वाढत्या वयोमानानुसार त्याचा परिणाम आपल्या चालण्या-फिरण्यावर होतो. केवळ शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे हा आजार अंगावर काढण्याऐवजी योग्य वेळी त्याच्यावर उपचार केल्यास त्याचा त्रास कमी होईल, असे डॉ. दीपू बॅनर्जी यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.