सकाळ वृत्तसेवा
२६ एप्रिल २०१०
योगिराज प्रभुणे
पुणे, भारत

साखळी दुकानांना आव्हान देण्यासाठी स्थापण्यात आलेल्या आहेत. पुण्यासह मुंबई आणि नागपूर शहरांमध्ये प्रत्येकी 25 दुकाने सुरू होणार आहेत. वाशीम, गडचिरोली, उस्मानाबाद, हिंगोली अशा छोट्या शहरांमध्ये प्रत्येकी पाच, तर उर्वरित शहरांमध्ये प्रत्येकी पंधरा दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.
खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने जगभरातील नामांकित साखळी दुकाने भारतात येत आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी स्थानिक औषधविक्रेत्यांनी एकत्रित येऊन एआयओसीडी आणि महाराष्ट्र सेफ केमिस्ट अँड डिस्ट्रिब्यूटर्स अलायन्स लिमिटेड' (एमएससीडीए) यांच्या माध्यमातून औषधाची साखळी दुकाने सुरू करीत असल्याची माहिती अखिल भारतीय औषध विक्रेता संघा'चे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सकाळ'ला रविवारी दिली.
राज्यात पाचशे, तर देशातील इतर राज्यांमध्ये शंभर साखळी औषधाची दुकाने सुरू होणार आहे. एक कळ दाबून या सर्व दुकानांचे फलक उघडले जातील. अशा अभिनव पद्धतीने हे उद्घाटन करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, गेली दोन ते अडीच वर्षे कंपनी साखळी दुकान स्थापन करण्यासाठी झटत आहे. या दुकानांमधून फक्त औषध विक्री होणार नसून, येणाऱ्या ग्राहकाला वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्यासाठी या दुकानामध्ये स्वतंत्र जागा असेल.
आगामी काळात औषध विक्रीतील स्पर्धा तीव्र होणार आहे. त्या स्पर्धेत वेगवेगळी साखळी दुकाने उतरतील. सध्या 98 टक्के औषध विक्री स्वतंत्र औषध दुकानांमधून होते. भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी या औषध विक्रेत्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी कोणावर जबरदस्ती करण्यात येणार नाही; पण साखळी दुकानांमध्ये आल्यावर येथील नियमांचे पालन करावे लागेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
साखळी दुकानांमध्ये सहभागी होणाऱ्या औषध विक्रेत्यांना ग्राहकांना वैद्यकीय मार्गदर्शन करणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ग्राहकांशी संवाद साधणे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षित औषध विक्रेत्यांच्या साखळी दुकानांमुळे ग्राहकांनाही फायदा होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
जगातील पहिला प्रयोग
स्वतंत्रपणे औषध विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन साखळी दुकाने सुरू करण्याचा जगातील पहिला प्रयोग आहे. औषध विक्रेत्यांच्या संघटनेचे हजारो सदस्य आहेत. हे सर्व जण यासाठी पात्र आहेत. यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या साखळी दुकानांच्या संघटनेला यातून आव्हान देणे शक्य होणार आहे, असे शिंदे यांनी सांगित