Print
Hits: 2767

सकाळ वृत्तसेवा
१९ जुन २०१०
पुणे, भारत

पुणे परिसरातील महिलांना स्तनाच्या कर्करोगावर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार मिळावेत यासाठी ससून रुग्णालयात खास उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती "ससून'चे अधिष्ठाता डॉ. अरुण जामकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, डिजिटल मॅमोग्राफी, केमोथेरपी आदी सुविधा या केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी भारतात फक्त तीन ते चार ठिकाणी उपलब्ध असलेले साडेसहा कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक 1.5 टेस्ला "एमआरआय' मशिन येथे आणण्यात आले आहे. डॉ. शेखर कुलकर्णी या विभागाचे प्रमुख म्हणून काम बघणार आहेत. दर मंगळवारी सकाळी दहा ते एक या वेळेत बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) काम चालणार आहे. या कर्करोगाच्या स्क्रीनिंगकरिता मॅमोग्राफीची सोय मोफत उपलब्ध आहे, असे डॉ. मीनाक्षी वहाणे यांनी सांगितले. या कर्करोगाच्या संदर्भातील पॅथॉलॉजीच्या सर्व अत्याधुनिक तपासण्या या विभागात उपलब्ध असल्याचे डॉ. कल्पना कुलकर्णी यांनी सांगितले. "एमआरआय'साठी सोळाशे व त्याच्या औषधासाठी 840 रुपये घेण्यात येणार आहेत, असे डॉ. जामकर यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.