Print
Hits: 2782

सकाळ वृत्तसेवा
०६ जुलै २०१०
सेलू, भारत

गेल्या चार दिवसांत तालुक्‍यातील गॅस्ट्रो रुग्णांची संख्या 96 वर गेली असून 25 रुग्णांवर सध्या येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी विकास अरुण उफाडे या दीड वर्षाच्या बालकाची परिस्थिती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

पावसामुळे सध्या नळांना गढूळ पाणी येत आहे. जलवाहिन्यांची गळती आहे. दूषित हवा आणि पाणी यामुळे गॅस्ट्रो रुग्णांत वाढ होत आहे. खासगी रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दोन स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांत शहरासह ग्रामीण भागातील पुरुष बारा, महिला आठ, मुलगे तीन, मुली दोन अशी संख्या आहे, असे डॉ. जाधव, डॉ. जनार्दन गोळेगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, रुग्णांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी रविवारी (ता. 4) रात्री आठच्या सुमारास रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची चौकशी केली. तालुकाध्यक्ष विनायक पावडे यांची या वेळी उपस्थिती होती.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.