Print
Hits: 2945

सकाळ वृत्तसेवा
२३ जुन २०१०
सांगली, भारत

शहरात चिकनगुण्या आणि डेंग्यूचा साथीचा फैलाव झाला आहे. सुमारे पाचशेंहून अधिक रुग्ण आढळले आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सलग आठ दिवस झालेला पाऊस, हवामानात झालेला बदल, अशुद्ध पाणीपुरवठा आणि डासांमुळे शहरात गेली पंधरा दिवस तापाची साथ आहे. हवेतील विषाणूमुळे लोक तापाने आजारी असून चिकनगुण्या आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, असे खासगी डॉक्‍टरांनी सांगितले.

लोकांची उपचारासाठी महापालिका, शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात गर्दी होत आहे. शहरात चिकणगुण्याचे पाचशेंहून अधिक आणि डेंग्यूचे 50 रुग्ण आढळले आहेत. झोपडपट्ट्या, गुंठेवारी वसाहत, खणभाग, जवाहर चौक परिसर या भागांत साथीचा फैलाव झाला आहे. घरटी एक रुग्ण आहे.

साथीचा फैलाव झाल्याने महापालिकेने आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या आहेत. आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे म्हणाले, ""काही भागांत साथीचे संशयित रुग्ण आढळले असून तिघांचे रक्तनमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ही साथ पसरू नये, म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. डास फवारणी आणि स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. औषधेही उपलब्ध करण्यात आली आहेत. उद्यापासून रुग्णशोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.''

लक्षणे अशी


घ्यावयाची काळजी

 

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.