सकाळ वृत्तसेवा
०३ ऑगस्ट २०१०
पुणे, भारत
स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार न करणाऱ्या शहर आणि जिल्ह्यातील 125 डॉक्टरांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले आहेत. डॉक्टरांनी उपचारात केलेल्या निष्काळजीपणाबद्दल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रा'तर्फे "रक्तदान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ;स्वाइन फ्लूचा गेल्या वर्षी झालेला उद्रेक लक्षात घेऊन, आरोग्य खात्याने या वर्षी सुरवातीपासून खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या आहेत. त्याला प्रत्येक नागरिकांना सहकार्य केले पाहिजे,'' असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. ते म्हणाले, ;खासगी डॉक्टरांनी स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार केले पाहिजेत. त्यांना पहिल्या 48 तासांमध्ये टॅमिफ्लू हे प्रतिबंधात्मक औषध दिले पाहिजे. आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी मुंबईतील खासगी डॉक्टरांच्या बैठकीत अशा सूचना दिल्या आहेत.'' स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यात दिरंगाई करणाऱ्या पुण्यातील 125 डॉक्टरांना "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल ते म्हणाले, 'या सर्वांची "डीएमईआर'तर्फे चौकशी करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईच्या दृष्टीने पावले टाकली जातील.''
सव्वाशे डॉक्टरांवर होणार कारवाई
- Details
- Hits: 3357
0