सकाळ वृत्तसेवा
०६ मे, २०१०
नागपूर, भारत
कमी वेळात वजन कमी करणे शरीराला नुकसानदायक ठरू शकते. सहा महिन्यांत 5 ते 10 टक्के वजन कमी करणेच योग्य. जेवनात अनियमितता असल्यामुळे पिताशयाचा किडनीस्टोन' होतो. ट्रान्सफैट हायड्रोजिनीटेड तेल, वनस्पती मार्गरिन, मेयोनिज आदीचा उपयोग न करणेच योग्य. व्यायामामुळे किडनीस्टोन'ला थांबविता येऊ शकते, असे प्रतिपादन ईग्नूच्या विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. साबिहा वली यांनी केले.
ईग्नू विद्यापीठातील एम.एस.सीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने डायबेटीज केअर व रिसर्च सेंटर लेंड्रा पार्क रामदासपेठ येथे आहार व्याख्यान सत्र' नुकतेच पार पडले. नागपूर महाविद्यालयाचे माजी गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. साबिहा वली, मधुमेह विशेषज्ञ व डायबेटीज केअर व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनील गुप्ता, नागपूर विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाच्या अधिष्ठाता ज्योत्स्ना पाटील, केअर हॉस्पटलच्या मुख्य आहार विशेषज्ञ रिता भार्गव आदी उपस्थित होते.
समाजात आहाराविषयी जागरूकता निर्माण करून रुग्णांकडून आहारासंबंधी वाईट सवयी व विचारांना सुधारता येऊ शकते. समाजात आहार विशेषज्ञांचे कार्य व त्यांची उपयोगिता याबद्दल जागरूक असल्यास त्याचा उपयोग होईल, असे श्रीमती रिता भार्गव यांनी सांगितले.
यावेळी कमिटीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कविता गुप्ता, सचिवपदी अर्चना भोजवानी यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून कविता बक्षी ,वैशाली शेळके, सीमा फुलझेले, शिल्पा माटे, नमिता कार्यकारीणीच्या सदस्य म्हणून निवडण्यात आल्यात.
उपस्थितांचे आभार अर्चना भोजवानी यांनी मानले. कार्यक्रमास ईग्नूचे श्रीमती व्यवहारे, रिया शर्मा व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आयोजनासाठी डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटरच्या आहार विशेषज्ञ मनीषा फडके, विनिता मेहता, सायका खान, संगीता गुप्ता आदींनी सहकार्य केले.
व्यायामामुळे "किडनीस्टोन' थांबविता येऊ शकतो- डॉ. साबिहा वली
- Details
- Hits: 3000
0