सकाळ वृत्तसेवा
१३ मे २०१०
पुणे, भारत
पाण्यात चालण्याच्या माध्यमातून म्हणजेच वॉटर थेरपी ही विविध विकारांवर प्रभावी उपचारपद्धत आहे, असे प्रतिपादन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सचिन तपस्वी यांनी येथे केले. पाण्यात चालण्याचा व्यायाम करताना तज्ज्ञ मार्गदर्शकाची मदत घेणे सुरक्षित असते, असा सल्लाही त्यांनी दिला
पाण्यात चालण्याच्या व्यायामाचे फायदे आणि घ्यावयाची काळजी' या विषयावर डॉ. तपस्वी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. स. प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. राघव अष्टेकर, जलतरणपटू मनोज एरंडे या वेळी उपस्थित होते.
डॉ. तपस्वी म्हणाले,पाश्चात्त्य देशात 25 ते 30 वर्षांपासून "वॉटर थेरपी' वापरण्यात येत आहे. यालाच हायड्रोथेरपी असेही म्हणतात. कमरेइतक्या पाण्यात चालण्याने 50 टक्के, तर छातीइतक्या पाण्यात चालण्याने 75 ते 80 टक्के एवढा प्रतिबंधात्मक ताण शरीरावर येऊन त्याचा व्याधीनिवारणामध्ये उपयोग होतो. पाण्यात चालण्याच्या एक तासाच्या व्यायामाने शरीरातील सुमारे पाचशे उष्मांक खर्च होतो. वजन कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. पाण्यात चालताना पायाच्या बोटांना इजा होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी पाण्यात चालण्याच्या व्यायामाची प्रात्यक्षिके ऍक्वा ऍरोबिक्स तज्ज्ञ साधना सरपोतदार यांनी केली. प्रा. किरण लागू, ऍड. प्रदीप भोळे, शीतल कान्हेरे यात
वॉटर थेरपी विविध विकारांवर प्रभावी - डॉ. सचिन तपस्वी
- Details
- Hits: 3606
0