सकाळ वृत्तसेवा
२१ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
हार्ट एड सोसायटी ऑफ इंडिया आणि सुराणा समूहाचे रुग्णालय संयुक्तरीत्या दर दिवशी एका गरजू व गरीब रुग्णावर मोफत बायपास शस्त्रक्रिया करणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या गरजू आणि गरीब रुग्णांना दरमहिन्याला एक लाख रुपयांपर्यंतची औषधे मोफत देणार आहे.
या दोन संस्थांनी आपापसांत केलेल्या करारानुसार बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा ऍन्जिओप्लास्टीसाठी येणारा खर्च "हार्ट एड सोसायटी ऑफ इंडिया' देणगी म्हणून हॉस्पिटलला थेट देणार आहे. या रुग्णांच्या सुरवातीच्या सर्व चाचण्या करून आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांना सोसायटीच्या विश्वस्तांकडे मुलाखतीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्या रुग्णाची बायपास शस्त्रक्रिया किंवा ऍन्जिओप्लास्टीची तारीख ठरविण्यात येणार आहे. सुराणा समूहाची मालाड आणि चेंबूर येथे रुग्णालये आहेत. गरिबांना ही सेवा देता यावी म्हणून सोसायटीने त्यांच्या देणगीदारांना विशेष आवाहन केले आहे. त्यासाठी दर वर्षी एक हजार रुपये देणगी देऊन कायमचे देणगीदार व्हावे. देणगीदार कोणत्याही टप्प्यावर देणगी देण्याचे थांबवू शकतात. यासाठी दर वर्षी 10 हजार देणगीदार पुढे यावेत हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ट्रस्ट तीन वर्षांसाठी तीन हजार कायमचे देणगीदार उभारणार आहे. त्यामुळे 2014 पर्यंत सुराणा रुग्णालयाला रोज एक मोफत बायपास शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. याशिवाय ही सोसायटी गरिबांना कोणत्याही आजारासाठी दर महिन्याला एक लाख रुपयांची मोफत औषधे देणार आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहे - 9820048050.
रोज एका गरजूवर करणार मोफत बायपास शस्त्रक्रिया
- Details
- Hits: 3028
0