सकाळ वृत्तसेवा
०२ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
आरोग्य आणि निरामयतेसाठी सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योगा ऍण्ड नॅचरोपॅथी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यांतर्गतच्या "डिपार्टमेंट ऑफ आयुष'ने योग आणि निसर्गोपचाराची लोकप्रियता वाढविण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. येत्या काही महिन्यांत देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मोफत शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यातील पहिले शिबिर योग इन्स्टिट्यूटच्या सहयोगाने 4 व 5 तारखेला मुंबईत होणार आहे.
दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये सहभागींना योग व नॅचरोपॅथीतील प्राथमिक बाबींची माहिती करून दिली जाईल. तसेच लहानसहान गोष्टींचा आरोग्य व मानसिकतेवर कसा परिणाम होतो, ते सांगितले जाईल. हायपर टेन्शन, कार्डियाक, मधुमेह, रेस्पिरेटरी डिसऑर्डर, स्थूलता व महिलांमधील आजार अशा आरोग्याच्या तक्रारी असलेल्यांसाठी विशेष समुपदेशन व प्रशिक्षणही दिले जाईल. मुंबईतील शिबिरात 300 जणांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुकांना 26110506, 26122185 या दूरध्वनी क्रमांकांवर अथवा www.theyogainstistute.org येथे ऑनलाईन नोंदणी करता येईल.
योग, निसर्गोपचाराचा देशभर होणार प्रचार
- Details
- Hits: 3426
0