Print
Hits: 6562

सकाळ वृत्तसेवा
२६ नोव्हेंबर २०१०
डॉ. श्री बालाजी तांबे

यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते. म्हणूनच यकृताची आधीपासूनच काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.

यकृत हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव असतो. पञ्चदशकोष्ठोषु एकम्‌, दक्षिणकुक्षेः अधःस्थशरीरावयवः ।। ...चरक शारीरस्थान कोठ्यातील 15 अवयवांपैकी एक अवयव म्हणजे यकृत. हे कुशीमध्ये उजव्या बाजूला, उजव्या फुफ्फुसाच्या खाली असते. सामान्य स्थितीमध्ये यकृत बरगड्यांनी आच्छादलेले असते. मात्र आकाराने वाढले असता बरगड्यांच्या खाली जाणवू शकते.
आयुर्वेदानुसार यकृत रक्‍तापासून तयार झालेले असते आणि ते रक्‍तवहस्रोतसाचे मूळ असते. तसेच यकृत हा "मातृज' अवयव असतो, म्हणजे अपत्याच्या यकृतावर आईचा अधिक प्रभाव असतो. यकृत हे पित्ताचेही स्थान असते.

पित्तस्य यकृत-प्लीहानौ हृदयं दृष्टिस्त्वक्‌ पूर्वोक्‍तं च ।
...सुश्रुत सूत्रस्थान यकृत, प्लीहा (स्प्लीन), हृदय, डोळे, त्वचा ही पित्ताची महत्त्वाची स्थाने होत. पित्ताच्या पाच प्रकारांपैकी रंजक पित्त हे विशेषतः यकृतात राहते आणि रसधातूला रंग देऊन रक्‍त तयार करते, असेही आयुर्वेदात समजावलेले आहे. एकंदर पाहता यकृताचा आणि रक्‍ताचा खूप जवळचा संबंध असलेला दिसतो. प्रत्यक्षातही यकृतामध्ये बिघाड झाला तर त्यामुळे रक्‍त कमी होणे, रक्‍तातील दोषामुळे त्वचारोग होणे, वगैरे होताना आढळते.

यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते. म्हणूनच यकृताची आधीपासूनच काळजी घेणे खूप आवश्‍यक असते.

पचनसंस्थेतील अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत. मुखापासून गुदापर्यंतच्या महास्रोतसात (एलिमेंटरी कॅनॉल) जरी यकृत नसले तरी यकृतातील स्राव आतड्यांपर्यंत येत असतात व पचनक्रिया व्यवस्थित होत असते. यकृताची क्रिया मंदावली तर पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. आहाराचे पचन झाल्यावर जो आहाररस तयार होते, तोसुद्धा सर्वप्रथम यकृताकडे जातो आणि नंतरच सर्व शरीराचे पोषण होते. थोडक्‍यात, खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यासाठी आणि नंतर त्याचे शरीरधातूत रूपांतर होण्यासाठी यकृताचे योगदान महत्त्वाचे असते. शरीरातील अनावश्‍यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थांचा यकृतावर ताण येऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.

यकृतामध्ये बिघाड होण्याची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतात-

 

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.