Print
Hits: 2761

सकाळ वृत्तसेवा
०५ जून २०१०
नागपूर, भारत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) संसर्गजन्य रोगाचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. येथील टीबी वॉर्ड परिसरात दोन स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहेत.

दरवर्षी शहरात नवीन संसर्गजन्य आजार येतो. चंडिपुरा मेंदूज्वर, स्वाइन फ्लू असे नवनवीन साथीचे आजार जन्माला येत आहेत. याशिवाय गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, डेंगीच्याही रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यामुळे मेडिकलमध्ये स्वतंत्र संसर्गजन्य विभाग तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर तयार करण्यात आला. टीबी वॉर्ड परिसरातील त्वचारोग विभागाची इमातर पाडून त्या ठिकाणी संसर्गजन्य रोगाची स्वतंत्र इमारत तयार करण्यात येणार आहे. याशिवाय येथील दोन मेडिसीन वॉर्ड मेडिकलमध्ये आणले आहेत. यामुळे या भागात आता क्षयरोग व छातीरोग वगळता दुसरा विभाग नाही. यामुळे ही जागा संसर्गजन्य आजारांसाठी सोयीची ठरेल, असा विश्‍वास मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी व्यक्त केला.

प्रत्येक मजल्यावर एक प्रतीक्षालय
मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी प्रतीक्षालय नसल्यामुळे त्यांच्या निवासाची बिकट समस्या आहे. यामुळे मेडिकलमध्ये प्रत्येक मजल्यावर एक प्रतीक्षालय तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय संचालनालयाकडे पाठविण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. डोणगावकर यांनी सांगितले. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.