सकाळ वृत्तसेवा
०९ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
केंद्र सरकारचा प्रस्तावित मानवी अवयव प्रत्त्यारोपण कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचे अधिकार संसदेला देण्याबाबत राज्य विधिमंडळात ठराव मांडण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. प्रत्त्यारोपण कायदा संसदेने 1994 मध्ये मंजुरी दिल्यावर 1995 पासून लागू करण्यात आला. तो लागू करण्याचे अधिकार संसदेस देण्याचा ठराव राज्य विधिमंडळाने 14 जुलै 1992 रोजी मंजूर केला होता. आता या कायद्यात केंद्र सरकार सुधारणा करणार असल्याने त्यासह तो राज्यात लागू करण्याबाबत विधिमंडळात ठराव आणला जाणार आहे.
मानवी अवयव प्रत्त्यारोपण कायदा राज्यातही येणार
- Details
- Hits: 3158
0