सकाळ वृत्तसेवा
२७ एप्रिल २०१०
कोल्हापूर, भारत
गेल्या वर्षभरापासून पोट दुखीमुळे त्रस्त असलेल्या अलका कांबळे (वय 45) या महिलेच्या पोटातील सात किलोची गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात आली. येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात या महिलेवर डॉ. सारंग ढवळे यांनी ही शस्त्रक्रिया केली असून महिलेची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ. ढवळे यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षापासून महिलेच्या पोटात सतत दुखत होते. कालातरांने पोटाचा आकर ही वाढला. यानंतर ही महिला दोन आठवड्यापूर्वी येथील सिपीआर रूग्णालयात आली. आवश्यक त्या चाचण्या घेतल्यानंतर या महिलेच्या पोटात कॅन्सरची गाठ झाल्याचे निष्पन्न झाले. ही गाठ आंतड्याला व गर्भाशयाच्या पिशवीला चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया करणे ही कठीण होते. मात्र, अशाही स्थिती डॉ. ढवळे यांनी आंतड्याला इजा न होऊ देताही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. वसंत देशमुख, डॉ. विश्वनाथ मगदूम यांचे सहकार्य लाभले.