२२ जुन २०१०
डॉक्टर हा गेल्या दीड दशकांतला टीकेचा विषय. मोठ्या शहरांपासून ते लहानश्या गावापर्यंत साऱया ठिकाणी डॉक्टरांकडून होणाऱया पिळवणुकीच्या तक्रारींचा पाढा वाचला जातो. अशा परिस्थितीत पुण्यातील डॉक्टरांचा एक उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. सेवाव्रती वैद्यकीय पेशाला बळकट आधार देणारा आहे.
या डॉक्टरांनी एकत्र येऊन सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीसाठी वाद्यवृंद तयार केलाय. त्या माध्यमातून त्यांनी रुग्णांसाठी आर्थिक मदतीचा हात दिलाय. हा एखाद्या व्यावसायिक वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे असे वाटेल. पण हे डॉक्टर्स आपल्या गाण्यांच्या माध्यमातून रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालतात. गरीब रुग्णांसाठी यातून ते मदत गोळा करतात.गेली आठ वर्ष त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. या वाद्यवृदांत २५ डॉक्टर्स आहे. आतापर्यंत त्यांनी पन्नास लाख रुपये यातुन उभारलेत.