Print
Hits: 3636

महाराष्ट्र टाइम्स
२८ जुलै २०१०

पावसाळ्याच्या रोमॅण्टिक सीझनचा आस्वाद घेताना जहा आणि कांदाभजी पाहिजेच! पण, पावसाच्या या काळात अनेक आजारांचं थैमान सुरू होतं. म्हणूनच या काळात आरोग् याची काळजी घेण्यासाठी आहाराची काही पथ्यं पाळायला हवीत.

तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ या काळात खाऊ नका. कारण असे पदार्थ खाल्ले, की ते पोटात घट्ट बसून राहतात. अशा पदार्थांऐवजी कमी तिखटमीठ असणारे पदार्थ खा. ताजे बनवलेले पदार्थ पदार्थ खायला हवेत. ताजी फळं आणि भाज्या यासाठी हा सीझन बेस्ट! पण, ही भाज्या आणि फळं खाण्यापूवीर् नीट स्वच्छ धुवून घ्या. खास करुन फ्लॉवर, ब्रोकोली, वांगी, कंद आदी भाज्यांमध्ये धूळ, कृमी असण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात पचनसंस्थेची कार्यक्षमता मंदावते. म्हणूनच कमीत कमी तेल असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. ग्रिल्ड, बेक्ड् फूडला प्राधान्य द्या. तर जंक फूट टाळा. मांसाहार करणाऱ्यांनीही रस्सा, कालवण यापेक्षा सूप, स्ट्यू घेणं अधिक योग्य.

पचन संस्थेचं कार्य नीट चालावं, यासाठी फायबर आवश्यक आहे. तसंच घातक विषाणूंचा सामना करण्यासाठीही फायबरची गरज असते. म्हणूनच आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश करा. तसंच दही, ताक, योगर्ट यासारख्या प्रोबायोटिक पदार्थही खाता येतील.

सलाड, ज्यूस, कुल्फी, पाणीपुरी, चाट असे बाहेरचे पदार्थ खाणं टाळलेलंच बरं. कारण यात न शिजवलेल्या/ न धुतलेल्या भाज्या, फळं आणि मांस असू शकतं. बाहेरच्या पदार्थांमधलं पाणीही अशुद्ध असण्याची शक्यता आहे.

प्रवासात असताना बाहेरचं खाणं टाळा. कवच/टरफल असणारी फळं अशा वेळी खाणं सोयीस्कर होईल.

या काळात अनेक आजार पसरतात. म्हणूनच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या संत्र, मोसंब, पीच, पेअर, अननस, पपई, सफरचंद अशी फळं या काळात खा. लसूण, मिरी, आलं, हिंग, जिरे, हळद आणि कोथिंबीर यामुळे पचनशक्ती सुधारते तसंच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

हे लक्षात ठेवा

> पाणी उकळून आणि गाळून घ्या.
> भरपूर पाणी प्या.
> रोज एक सफरचंद खा.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.