सकाळ वृत्तसेवा
१० जुन २०१०
देवगड, भारत
तालुक्यातील थायरॉइडच्या रुग्णांसाठी येत्या 21 जूनला सकाळी 9 ते 12 या वेळेत येथील आठवले कॅंपसमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे. हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरपोथायरॉइडिझम आदी आजारांसाठी कायमस्वरूपी गोळ्या व वारंवार रक्ताची तपासणी करणे आवश्यक असते. यासाठी येथील लाईफलाईन फाऊंडेशनने शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात पूर्वी निदान झालेल्या थायरॉइडच्या रुग्णांची मोफत रक्त तपासणी करण्यात येईल. यासाठी रुग्णांनी पूर्वीचे सर्व वैद्यकीय अहवाल सोबत आणणे आवश्यक आहेत. याचवेळी मधुमेह रुग्णांच्या पायांच्या संवेदनांची सेन्सीटोमीटर या यंत्राद्वारे तपासणी व ब्लड शुगर तपासण्यात यईल. या सर्व तपासण्या मोफत करण्यात येतील. आवश्यक त्या मोतीबिंदूच्या रुग्णांची उपलब्ध संख्येनुसार मोफत भिंगरोपण शस्त्रक्रियाही करण्यात येईल. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुनील आठवले यांनी केले आहे.
थायरॉईड रुग्णांसाठी देवगडात 21 ला शिबिर
- Details
- Hits: 4462
0