सकाळ वृत्तसेवा
१४ सप्टेंबर २०१०
मुंबई, भारत
गणेशोत्सवाच्या काळात डोळ्यांच्या साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिली आहे. गणरायाच्या दर्शनासाठी सर्वत्र गर्दी असल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
मुंबईत डोळ्यांची साथ नाही. मात्र, या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी मान्य केले. सध्या गणेशात्सवाची सगळीकडे जोरदार धामधूम सुरू आहे. गणरायाच्या दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगा लागत आहेत. अशा वेळी डोळ्याच्या साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती असल्याने रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जावू नये तसेच, लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे. रुग्णांच्या संख्येत दहा टक्के वाढ झाल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते तात्याराव लहाने यांनी सांगितले. रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे पालिकेचे मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी गौरिश आंबे यांनी सांगितले.
डोळ्यांच्या साथीचे मुंबईत वाढते रुग्ण
- Details
- Hits: 3743
0