सकाळ वृत्तसेवा
०२ जुन २०१०
डोंबिवली, भारत
डोंबिवलीच्या "एस' बालरुग्णालयातर्फे पदवीधर डॉक्टरांसाठी बालआजारांविषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचे वर्ग 20 जूनपासून सुरू होणार आहेत. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा कोणत्याही शाखेच्या पदवीधर डॉक्टरांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.
लहान मुलांच्या आजाराची समग्र माहिती देऊन त्याचे निदान व उपचारपद्धतीविषयी मार्गदर्शन केले जाईल. हा अभ्यासक्रम चार महिन्यांचा आहे. रविवारी सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत मानपाडा रस्त्यावरील स्टारकॉलनी जवळील एस रुग्णालयात हा वर्ग घेण्यात येईल, अशी माहिती "एस'चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिली. याचे शुल्क तीन हजार रुपये आहे. डॉ. उल्हास कोल्हटकर, डॉ. श्रीपाद कुलकर्णी, डॉ. गोविंद कुलकर्णी आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. रुग्णालयात प्रात्यक्षिकही दिले जाईल.
"एस' हे लहान मुलांसाठीचे अद्ययावत साधनसामग्री असलेले डोंबिवलीतील सुसज्ज रुग्णालय आहे. सर्जरी, ऑर्थो सर्जरी, न्यूरोसर्जरी, नेफरोलॉजी, कार्डिओलॉजी, ईएनटी आदी विविध आजारांवरील लहान मुलांसाठीचे 30 तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयाशी संलग्न आहेत. संपर्क : एस रुग्णालय : 2870295,3260189. डॉ.गोविंद कुलकर्णी : 9833587483.