सकाळ वृत्तसेवा
०३ मे २०१०
औरंगाबाद, भारत
मोठ्या नंबरचा चष्मा हा कायम चिंतेचा व अडचणीचा विषय असतो. मोठा नंबर कमी करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. जागतिक पातळीवर मान्यता पावलेले लेसिक हे यंत्र आता मुंबईतील जेजे रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांनाही फायदा मिळणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना जेजे रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने म्हणाले, "तीन कोटी 61 लाख रुपपयांचे अमेरिकन एफडीए मान्यताप्राप्त असलेले लेसिक हे यंत्र जेजे रुग्णालयातील नेत्र विभागात कार्यान्वित करण्यात येत आहे. हे यंत्र रुग्णालयात दाखल झाले आहे. राज्य सरकारच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात देशात सर्वप्रथम आपल्याकडे हे यंत्र आले आहे. केंद्र सरकारने एम्स दिल्ली आणि चंडीगड येथील शासकीय रुग्णालयात हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या लेसिक यंत्राद्वारे चष्म्याचा नंबर कमी करता येतो. बुबुळाची जाडी कर्व्हेचर असते. लेसर तंत्रज्ञानामुळे बुबुळाची जाडी कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात येते. महिला आणि पुरुषांमध्ये विशिष्ट वयानंतर चष्म्याचा नंबर वाढत नाही. त्यानुसारच ही शस्त्रक्रिया केली जाईल. जवळचा, लांबचा तसेच सिलेंड्रिकल नंबर असलेले चष्म्याचे नंबर लेसिकद्वारे कमी करता येतात.''
"शस्त्रक्रियेनंतर सात दिवस डोळ्यांची काळजी घ्यावी लागते. साधारणपणे जेजे रुग्णालयात 15 मेपासून लेसिकद्वारे शस्त्रक्रिया सुरू होतील. सर्वसाधारण तसेच दारिद्य्ररेषेखाली रुग्णांना माफक दर यासाठी आकारण्याचा आमचा विचार आहे,'' असे डॉ. लहाने यांनी नमूद केले.
जेजे रुग्णालयात लेसिक यंत्र उपलब्ध
- Details
- Hits: 3703
0