सकाळ वृत्तसेवा
२१ जुलै २०१०
रत्नागिरी, भारत
देशातील सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक औषधे माफक दरात उत्पादित करून वितरीत करण्याची घोषणा काही काळापूर्वी "ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने' केली होती, ती आता सत्यात उतरली आहे. देशातील ही पहिली कंपनी जगन्नाथ शिंदे या महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या नेतृत्वाखाली उभी राहिली आहे. प्रायव्हेट लेबल या नावाने 100 औषधे देशाच्या 15 राज्यांमध्ये वितरित होत आहेत.
े रत्नागिरी जिल्ह्यातील वैजनाथ जागुष्टे यांची देशातील अशा प्रकारच्या पहिल्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टरपदी निवड झाली आहे. सर्वसामान्य लोकांना दर्जेदार औषधे माफक दरात देण्याच्या या प्रयत्नातील पहिल्या टप्प्यात 100 प्रकारच्या औषधांचे उत्पादन केले जात आहे. देशातील 15 राज्यांतील छोट्या छोट्या शहरातील औषध दुकानात ती ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन झाले आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार झालेली ही औषधे देशातील फार्मा क्षेत्राला नवी दिशा देतील, असा विश्वास एआयओसीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात व एआयओडीसीच्या देशभरातील सभासदांच्या उपस्थितीत ही औषध ग्राहकांसाठी खुली करण्यात आली.
जीवनावश्यक औषधांचे माफक दरात वितरण
- Details
- Hits: 3330
0