सकाळ वृत्तसेवा
२५ जुन २०१०
पुणे, भारत
"राज्यातील कीटकजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खाते सज्ज झाले आहे,'' अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. व्ही. डी. खानंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. डासांची उत्पत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
"राज्यात हिवताप, हत्तीरोग, डेंगी, चिकुनगुनिया, "जॅपनीज एन्सेफेलायटिस' (जे.ई.) आणि चंडीपुरा हे कीटकजन्य आजार होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने सर्व खबरदारीचे उपाय आखले आहेत,'' असे त्यांनी सांगितले.
डॉ. खानंदे म्हणाले, ""हिवताप, डेंगीमुळे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करणे व रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे, हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हिवतापाच्या अतिसंवेदनशील ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. मुंबईसह पंधरा शहरांमध्ये अळीनाशकांची फवारणी होत आहे.''
कीटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य खाते सज्ज
- Details
- Hits: 3153
0