सकाळ वृत्तसेवा
१० जून, २०१०
पूणे, भारत
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे येत्या रविवारी (ता. 13) 'फॅमिली डॉक्टर क्लब'च्या सदस्यांशी 'किडनीचे आजार व मूत्रविकार' या विषयावर 'व्हिडिओ कॉन्फरन्स'च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. सकाळी दहा ते अकरा या वेळात पहिली, तर साडेअकरा ते साडेबारा या वेळात दुसरी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' होईल. ही दहावी 'व्हिडिओ कॉन्फरन्स' आहे.

डॉ. तांबे कार्ला येथून क्लबच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. या दोन्ही 'कॉन्फरन्स'ला प्रत्येकी पन्नास सदस्यांना सहभागी होता येईल. 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या सूत्राने प्रवेश देण्यात येणार आहे. बुधवार पेठेतील 'सकाळ'च्या मुख्य कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर ही "व्हिडिओ कॉन्फरन्स' होणार आहे.
पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक येथील 'सकाळ'च्या कार्यालयांत 'व्हिडिओ कॉन्फरन्स' होईल. या शहरांतीलही पन्नास सदस्यांना याचा लाभ घेता येईल. सदस्यांनी "कॉन्फरन्स'ला येताना प्रश्न लिहून आणावेत. ते थोडक्यात व नेमके असावेत.
पुण्यातील सदस्यांनी राहुल पाटील यांच्याशी 9011017702 या मोबाईल क्रमांकावर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपर्क साधावा.