सकाळ वृत्तसेवा
०३ मे २०१०
पुणे, भारत
एमक्युअर फार्मास्युटिकल्सच्या जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सतर्फे कर्करुग्णांना परवडणारी पेजेक्स (पेगफिलग्रॅटिझम) बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत.
पेजेक्सची किंमत 17 हजार 900 इतकी असून, कर्करोगावरील हे सर्वांत स्वस्त औषध आहे. याबाबत जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय सिन्हा म्हणाले, ""हे औषध अकरा हजार रुग्णांवर वापरले आहे. त्यांतील दोन हजार 100 रुग्णांच्या अनुभवांचा अभ्यास करून त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. पेजेक्सच्या व्यावसायिक सुरवातीमुळे जिनोव्हाने कमी किमतीत उच्च तंत्रज्ञान देण्याची परंपरा कायम राखली आहे.''
"एमक्युअर फार्मास्युटिकल्स'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) अरुण खन्ना म्हणाले, ""सर्वसाधारणपणे 10 ते 57 टक्के रुग्णांमध्ये सिटॉक्सिक केमोथेरपीमुळे "न्युट्रोपेनिया' दिसून येतो. सध्या फिलग्रॅमिस्टिम ही वाढीची उपाययोजना केली जाते. 5 ते 10 दिवसांच्या केमोथेरपी सायकलनुसार रोजचे एक इंजेक्शन दिले जाते. काही कारणांमुळे केमोथेरपीचा डोस लांबल्याने फिलग्रॅमस्टिमचे इंजेक्शन देता येत नाही. पेजेक्समुळे प्रत्येक केमोथेरपीच्या उपचारानंतर तीच सुरक्षा आणि फिलग्रॅस्टिमचा परिणाम साधता येतो.''