Print
Hits: 3292

सकाळ वृत्तसेवा
१८ जुन २०१०
कन्नड, भारत

कन्नड शहरात दूषित पाण्यामुळे16 व 17 या दोन दिवसांत पुन्हा वीस रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. आजपर्यंत गॅस्ट्रोचे एकूण रुग्ण 70 झाले आहेत. त्यापैकी सोळा रुग्णांना कॉलरा असल्याचे निदान झाले आहे. ग्रामीण भागातील एकास कॉलरा झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने जिल्हा अध्यक्ष शेख चॉंद यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 17) दिवसभर पाणी निर्जंतूक करण्यासाठी जीवन ड्रॉपचे वाटप करण्यात आले.

यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना अघटराव, डॉ. रुबीना शहा यांनी सांगितले की ता. 16 व 17 या दोन दिवसांत गॅस्ट्रोचे वीस रुग्ण दाखल झाले. डॉ. पी. एम. मुरंबीकर, डॉ. प्रवीण पवार, आर. डी. चव्हाण, एस. जे. राठोड, श्रीमती व्ही. एन. साळवे, रुबीन शहा, डी. व्ही. दवंगे, आदी उपचार करत आहेत.

औरंगाबाद येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आफरीन आरेफ शेख रा. करीमनगर, सलीम युसूफ खान (42), रा. खॉंसाबका बंगला, नसीमोद्दीन शमशोद्दीन (वय 22, रा. काझी मोहल्ला, सिफान सलीम खान (6) रा. काझी मोहल्ला, फरजान सलीम खान (15), रा. काझी मोहल्ला, सलमान जावेद शेख (वय 3), रा. पांढरी मोहल्ला, अब्दुल रहीम समीम (वय 4), रा. खॉंसाबका बंगला, सबीया हमद शेख (32) रा. काझी मोहल्ला, सय्यद गयास अली (70) रा. राजवाडा, महेमुन्नाबी इब्राहिम अन्वर (40), रा. भाजी मंडई, समीर रफीयोद्दीन शेख (92), रा. समता कॉलनी, दिलावर सरदार खान (70), रा. बडा बंगला. वसीम रशीद मन्सुरी (20) रा. टिळक नगर, या तेरा रुग्णांना कॉलरा असल्याचे निष्पन्न झाले. बशीर खॉं महेताब खॉं (50) रा. कुंजखेडा, या रुग्णास कॉलरा असल्याचे निदान झाले आहे. कॉलराग्रस्त रुग्णाच्या समवेतच्या सर्व नागरिकांना, कुटुंबियासही औषधोपचार करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने पाणी निर्जंतूक करण्यासाठी जीवनड्रॉपचे वितरण करण्यात आले.

जिल्हाअध्यक्ष शेख चॉंद, बाजार समितीचे सभापती शिवाजी आबा बोलधने, प्रसन्ना पाटील, ऍड. चंदू शहा, शहराध्यक्ष नूर महंमद, जब्बार खान, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सचिव हमीद शेख, जिल्हा उपाध्यक्ष मुजीब सुभान शेख, गोकुळ राठोड, नवनाथ काळे, अहमद अली, नूर गॅरेजवाले, नाजीरोद्दीन शेख, खाजा शेख, आदींनी प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन जीवन ड्रॉपचे वाटप केले. नागरिकांनी पाणी उकळून, निर्जंतूक करून प्यावे, असे आवाहन केले. युवराज बनकर यांनी आभार मानले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.