Print
Hits: 2830

सकाळ वृत्तसेवा
२७ मे २०१०
मुंबई, भारत

एक्‍स रे, सिटीस्कॅन, एमआरआय चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा; तसेच, रुग्णालयांना इमेजिंग सेवेसाठी आता क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून अधिस्वीकृतीचे निकष लावण्यात आले आहेत. या चाचण्या करीत असताना होणाऱ्या किरणोत्सर्गाचा परिणाम हा अनेकदा आरोग्यास हितावह नसतो. त्याची पूर्वकल्पना रुग्णास देणे आवश्‍यक असते; परंतु प्रत्यक्षात अशी कल्पना रुग्णांना किंवा ही चाचणी करणाऱ्याला अनेक रुग्णालयांतून दिली जात नाही. त्यामुळे त्या रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा काय आहे, याची कल्पनाच नसते. म्हणूनच क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने यापुढील काळात रुग्णांचे हित लक्षात घेऊन ही अधिस्वीकृती बंधनकारक केली आहे.

कोणत्याही आजाराचे निदान करण्यासाठी इमेजिंग करीत असताना असणाऱ्या संभाव्य धोक्‍याच्या साऱ्या शक्‍यतांचा विचार करून अधिस्वीकृतीचे निकष बनवण्यात आल्याचे संस्थेचे सचिव डॉ. गिरीधर जे. ग्यानी यांनी सांगितले आहे. एक्‍स रे, फ्ल्युओरोस्कोपी, यु.एस.जी, सिटीस्कॅन, एम.आर.आय, न्युक्‍लिअर इमेजिंगसाठी काही विशेष मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत. त्यामुळे दर्जेदार सेवा देण्याच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक करणाऱ्या पॅथॉलॉजींना चाप बसेल, असा विश्‍वास कौन्सिलने व्यक्त केला आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.