सकाळ वृत्तसेवा
०३ डिसेंबर २०१०
पुणे, भारत
अपंगत्वावर मात करीत विविध शाळांमधील 200 विद्यार्थ्यांनी रामायणातील सेतूबांधणी, सीता स्वयंवर, अशोकवन, लढाई असे वेगवेगळे प्रसंग गुरुवारी सादर केले. निमित्त होते "रामायण ऑन व्हील्स' या महानाट्याचे.
जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने बाल कल्याण संस्थेच्या वतीने आयोजित या महानाट्यात पुणे जिल्ह्यातील विविध शाळांतील कर्णबधिर, अंध, मतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पारंपरिक वेशात त्यांनी रामायणावर आधारित 18 नाट्यप्रवेश या वेळी सादर केले. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते सल्लाउद्दीन पाशा यांनी केले आहे. "अशा प्रकारचे महानाट्य पुण्यात प्रथमच सादर होत आहे. या महानाट्याचा पुढील प्रयोग रविवारी (ता. 5) गणेशखिंड रस्त्यावरील संस्थेत सायंकाळी सहा आणि आठ वाजता होईल,' अशी माहिती व्यवस्थापिका मिनिता पाटील यांनी दिली.
अपंगत्वावर मात करून "रामायण ऑन व्हील्स'
- Details
- Hits: 3603
0