सकाळ वृत्तसेवा
२८ मे २०१०
नागपूर, भारत
कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचे बळी वाढत असतानाच अतिसार आणि काविळीच्या रुग्णांतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पोटात दुखणे, चक्कर येणे, डोके दुखणे अशा नव्याच व्याधींना नागपूरकरांना सामोरे जावे लागत आहे.
उन्हाने 45 अंशाची सीमा कधीच पार केली. पारा कधी 46, तर कधी 47 अशांच्या पुढे जात आहे. त्यातूनच उष्माघाताच्या बळींची संख्या वाढली आहे. त्याचवेळी वेगवेगळ्या व्याधींनी नागपूरकरांना ग्रासणे सुरू झाले आहे. सध्या अचानक डोके दुखणे, पोटात दुखणे, चक्कर येणे, उलट्या होणे हा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच यामुळे त्रस्त आहेत. दवाखाने फुल्ल आहेत. यासंदर्भात वेळीच काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
हे टाळा
- थंड हवेतून थेट उन्हात जाणे
- डोक्याला काहीही न बांधणे
- कुठलेही पाणी पिणे
- शिळे अन्न खाणे
- उघड्यावरचे अन्न खाणे
- कापून ठेवलेली फळे खाणे
- उघड्यावरचा ज्यूस पिणे
- पाऊचचे पाणी पिणे
- उन्हातून येताच पाणी पिणे
हे करा
- उन्हात फिरणे टाळा
- सूती कपडे घाला
- डोक्याला काहीतरी बांधा
- भरपूर पाणी प्या
- साखर-मीठ-पाण्याचे मिश्रण प्या
- साखरगाठीचे पाणी प्या
- कूलरच्या थंड हवेतून उन्हात जाणे टाळा
- खिशात कांदा ठेवा
- त्वचेची काळजी घ्या